बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
✍️ मंगेश पोटवार, मूल
शेतीचे हंगाम पुर्ण झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान विक्रीसाठी आणले, मात्र बुधवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या पावसाने धानाचे हजारो पोते भिजले, बाजार समितीच्या दुर्लक्षीतपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीप्रती रोष व्यक्त केला आहे.
✍️ मंगेश पोटवार, मूल
शेतीचे हंगाम पुर्ण झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान विक्रीसाठी आणले, मात्र बुधवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या पावसाने धानाचे हजारो पोते भिजले, बाजार समितीच्या दुर्लक्षीतपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीप्रती रोष व्यक्त केला आहे.
मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर शेतकरी राहतात, खरीप हंगामामध्ये येथील शेतकरी धानाची पेरणी करतात, सुरूवातीला धान पिकासाठी पावसाची गरज असताना पावसाने दगा दिला, शेतकऱ्यांनी बोळी, तलावाचे पाणी करून धान पिक घेतले, काही शेतकरी धान कापुन ठेवले असताना अतिवृष्टीच्या पावसाने संपुर्ण धानाच्या सरडया पाण्यात भिजले, अतिवृष्टीतुनही काही शेतकऱ्यांनी आपल्या धानाचे संरक्षण केले, दरम्यान मूल येथील बाजार समितीमध्ये धान विक्रीसाठी आणुन ठेवले असताना बुधवारी पहाटे आलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हजारो पोते धान भिजले. विदर्भात पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविले असताना मूल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतीही उपाय योजना केलेली नाही, यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हटल्या जाते परंतु मूल येथील कृषी उत्पन बाजार समिती शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचे यावरून दिसून येत आहे. अतिवृष्टीच्या पावसात ज्या शेतकऱ्यांचे धान पावसात भिजले अशा ंशेतकऱ्यांना आर्थीक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
बाजार समिती मार्फत उपाययोजना केली होती: सभापती घनश्याम येनुरकर
बाजार समिती परिसरात विक्रीसाठी आणलेले धानाचे पोते भिजु नये यासाठी बाजार समितीने ताळपत्रीची व्यवस्था करून ठेवलेली होती, त्यासोबतच दलालानाही ताळपत्री ठेवण्याचे निर्देष दिले होते, मात्र रात्रौ अचानक पाऊस आल्याने काही शेतकऱ्यांचे धान भिजले, परंतु बाजार समितीमार्फत उपाययोजना करण्यात आली होती अशी प्रतिक्रीया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर यांनी दे धक्का एक्सप्रेसला दिली.