भोजराज गोवर्धन, मूल
लोकसभा आणि विधानसभेची निवडणुक पार पडली, आता नागरीकांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लागले आहे, लोकसभेत भाजपा उमेदवाराचा दारून पराभव झाला, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुधीर मुनंगटीवार मोठ्या मत्ताधिक्याने विजयी झाले, मूल तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांमधील असलेल्या अंतर्गत गटबाजीला त्रस्त झालेल्या एका भाजप नेत्याने, मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्यास तो कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून निवडणुक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता मूल शहरात चर्चेली जात आहे. Mul Chandrapur
राज्याचे माजी कॅबीनेट मंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन मूल तालुक्याचा न भुतो न भविष्यती असा विकास केलेला आहे, त्यांच्या नेतृत्वात मूल नगर पालीका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता स्थापन केले होते, ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असलेल्या अनेक ग्राम पंचायतवरही भाजपाचा झेंडा रोवण्यात यशस्वी झाले. मात्र जवळपास 2 वर्षापासुन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मूल नगर पालीकेवर प्रशासकराज सुरू आहे, यामुळे काही प्रमाणात शहराचा विकास खुंटल्याचे जाणवत आहे, Mul Municipal Council
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्यासंदर्भात संकेत दिले आहे. Devendra Fadnvis दरम्यान मूल नगर परिषदच्या नगराध्यक्ष, नगरसेवक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडुन निवडणुक लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत, मूल तालुक्यात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आपसात अनेक गट असल्याचे दिसते, यापदाधिकारी कार्यकर्त्यांमधील अनेकजण लोकसभा निवडणुकीत काम केलेले नाही, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा दारून पराभव झाला, विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल तालुक्याकडे स्वतः लक्ष देवुन निवडणुक प्रचारात आघाडी घेतली होती, यामुळेच सुधीर मुनगंटीवार यांना मूल तालुक्यातुन मोठी लिड मिळाली होती. Sudhir Mungantiwar
लोकसभे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजपाचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते पाहिजे त्याप्रमाणात काम केलेले नाही, केवळ ठेकेदारी चालावी यासाठी मूलचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते वरवर काम केल्याचे दिसुन आले. लोकसभा, विधानसभा निवडणुक पार पडली, आता स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालीकेची निवडणुक काही महिण्यावर घेण्याचे संकेत आहे, अशातच मूल येथील भाजपाचा एक नेता, नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्यास ते कॉंग्रेसच्या खेम्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर नेता मागील नगर पालीकेत सदस्य होता, आणि त्यांना मूल शहरात मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे त्याला उमेदवारी न मिळाल्यास भाजपाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारातही त्यांनी महत्वाची भुमिका निभावल्याची चर्चा आहे.