एचआयव्ही बाधीत व्यक्तीशी भेदभावपुर्ण वागणुक देवु नये : डॉ. रामेश्वर बावणे HIV awareness

HIV awareness
HIV awareness

जागतिक एडस् दिनानिमीत्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

मूल (प्रतिनिधी): राज्यात एच आय व्ही रूग्णांची संख्या वाढु नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नरत आहे, त्यासाठी आरोग्य कर्मचारी जनजागृती करीत आहे, काही रूग्ण बांधीत आहेत, त्यांच्यावर औषधौपचार सुरू आहे, त्यांच्यासोबत काम करणाÚया इतर व्यक्तींनी बांधीत व्यक्तीशी भेदभावपुर्ण वागणुक देवु नये असे आवाहन मूलचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामेश्वर बावणे यांनी केले. ते संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था चंद्रपूर द्वारा संचालित लिंक वर्कर स्कीम चंद्रपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र राजोली येथे आयोजीत केलेल्या जागतिक एड्स दिन निमित्य जनजागृती कार्यक्रमात बोलत होते. PHC Rajoli

कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आखाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास नागोरीया, राजोलीचे सरपंच जितेंद्र लोणारे, आरोग्य विस्तार अधिकारी वैद्य, लिंक वर्कर प्रशांत कवाडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नामपल्लीवार, डोंगरगांवचे माजी सरपंच मुकेश गेडाम, सामाजिक कार्यकर्ते विजय पाकमोडे, अंगणवाडी पर्यवेक्षक लिना जम्बुलवार, बी. आर. भूरसे, श्रीमती बी. आर. वालदे उपस्थित होते. Awareness campaign on the occasion of World AIDS Day

यावेळी एड्स प्रतिबंध व नियत्रण कायदा 2017 मधील तरतुदी व अधिनियमाची माहिती राजोली येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आखाडे यांनी विद्यार्थ्यांना देवुन जनजागृतीपर मार्गदर्शन केले. Mul

कार्यक्रमाचे संचालन प्रशांत कवाडे यांनी केले. कार्यक्रमाला शाळकरी विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. HIV awareness