झोपेत असलेल्या महिलेवर बिबटयाचा हल्ला Leopard attack

Leopard attack
Leopard attack

वनमंत्र्यांच्या गृहक्षेत्रातील घटना

मूल (प्रतिनिधी): रात्रौ झोपुन असलेल्या एका महिलेवर बिबटयाने घरात घुसुन हल्ला केल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा शिवापूर चक येथे शुक्रवारी पहाटे 4 वाजता दरम्यान घडली. वंदना परशुराम निमगडे वय 48 वर्षे रा. शिवापूर चक असे बिबटयाच्या हल्लात जखमी झालेल्या महिलेचे नांव आहे. Leopard attack on woman

मूल तालुक्यातील मौजा शिवापूर चक येथे परशुराम आबाजी निमगडे आपल्या कुटुंबियासह राहतात, घराला लागुन बगिचा आणि काही अंतरावर बफर क्षेत्राचे जंगल आहे. निमगडे यांचे कुटुंबिय रात्रौ झोपेत असताना शुक्रवारी पहाटे 4 वाजता दरम्यान बिबट घरात घुसुन वंदना परशुराम निमगडे हिच्यावर हल्ला केला, काही अंतरावर असलेल्या कुत्र्यांनी बिबटयाला बघुन भुकण्याचा आवाज करीत असल्याने निमगडे कुटुंबिय जागे झाले, Vandana Parashuram Nimgade दरम्यान बिबटया वंदनावर हल्ला करीत असल्याचे दुष्य बघुन घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केल्याने बिबट पळुन गेला मात्र बिबटयाच्या हल्यात वंदना निमगडे ही जखमी झाली. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होवुन जखमी वंदना निमगडे हिला मूल येथील उपजिल्हा रूग्णलयात उपचारार्थ दाखल केले. वनविभागाने पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.

बिबटयाच्या हल्लामुळे गावकरी भयभित
तालुक्यातील शिवापूर चक येथे बिबट घरात घुसुन हल्ला केल्याने गावकरी भयभित झाले असुन, बिबटयाचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करीत आहे. Forest Department