डोंगरगांव शेतशिवारात आढळला वाघाचे मृत्तदेह Carcass of a tiger

Carcass of a tiger
Carcass of a tiger

न्युमोनिया संसर्गामुळे मृत्यु झाल्याची शंका

निनाद शेंडे, मूल : तालुक्यातील डोंगरगांव शेतशिवरात वाघाचे मृत्तदेह आढळुन आल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. सदर वाघ मादी असुन अंदाजे दिड वर्षाची आहे. न्युमोनिया संसर्ग झाल्याने सदर वाघाचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती वनविभागाच्या सुत्रानी दिली. Pneumonia infection

मूल, सावली तालुक्यात वाघाची संख्या मोठया प्रमाणावर आहे, मूल तालुक्यातील राजोली वनक्षेत्र हे सावली वनपरिक्षेत्रात येतो, डोंगरगांव येथील माया रमेश सांगुळले यांच्या सर्व्हे नं. 1038 या शेतात शेतकरी कामानिमीत्य गेले असता त्यांना वाघ मृत्यावस्थेत आढळुन आला, त्यांनी याबाबत गावात माहिती दिली. गावकÚयांनी वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा केला. सदर वाघ हे दिड वर्षाचे असुन मादी जातीचे आहे. न्युमोनिया संसर्गामुळे वाघाचा मृत्यु झाल्याची शंका वर्तविली जात आहे. सदर वाघाचे मृतदेह चंद्रूर येथील टि टि सी केंद्रात नेउन शवविच्छेदन करण्यात आले. व त्याच ठिकाणी दहण करण्यात आले. Rajoli forest area in Mul taluka

घटनास्थळाला विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहा. वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजिव) यांचे प्रतिनिधी उमेश झिरे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संघटनाचे प्रतिनिधी मुकेश भांडककर यांनी भेट देवुन पाहणी केली. यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारीही मोठया संख्येने उपस्थित होते. Forest