दोन एमपीटी इंजीनमध्ये धडक Collision between two MPT engines

Collision between two MPT engines copy

चार कर्मचारी जखमी, एक गँभीर जखमी 

संगिता गेडाम, मूल : रेल्वे रूळाची देखभाल करणाऱ्या दोन एमपीटी इंजीन एकमेकांना आदळल्याने चार कर्मचारी जखमी झाल्याची घटना मूल रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी (ता. 5 ऑक्टों.) रोजी सकाळच्या सुमारास घडली. Mul Railway Station

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळाचे काम करण्यासाठी एक एमपीटी इंजिन उभी होती, दरम्यान मूल रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या दुसऱ्या एमपीटी इंजिनने असलेल्या एमपीटी इंजिनला धडक दिली. यामधील इंजि. दिवाकर वय 35 वर्षे, तज्ञ कर्मचारी पुरूषोत्तम प्रसाद वय 35 वर्षे, ओमप्रसाद साहु वय 50 वर्षे आणि पि वे कर्मचारी अनिल पेंदाम जखमी झाले. तर तज्ञ कर्मचारी संजीतकुमार वय 35 वर्षे हे गंभीर जखमी झाले आहे. सदर धडकेमुळे जोराचा आवाज झाल्याने जवळील नागरीक काही वेळासाठी भयभित झाले होते. employees injured

सदर अपघातामुळे एका इंजिनचा दर्शनी भाग क्षतिग्रस्त झाला आहे. सदर अपघातातील जखमीं कर्मचाऱ्या वर उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात उपचार पाठविण्यात आले आहे.