विज पारेशन कंपनीच्या वतीने निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन Essay and Painting Competition

International Right to Information Act 2005
International Right to Information Act 2005

मूल (प्रतिनिधी): येथील विज पारेशन कंपनी मूलच्या वतिने माहिती अधिकार अधिनियम याविषयावर निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्ततेने सहभाग घेतला होता. Mahatransco

International Right to Information Act 2005 0
International Right to Information Act 2005 0

कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही. डी. जिरकुंटवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता दारंव्हेकर होते. प्रमुख अतिथी म्हणुन उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया, सहा. अभियंता पंकज उजवने, पिंपळशेंडे आदी उपस्थित होते. Chandan Choursiya

अंतराराष्ट्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याची माहिती कर्मचारी आणि त्यांचे पाल्याना व्हावा यासाठी अधिनियमात काय आहे, कुणासाठी आहे व त्याचे महत्व काय याची सविस्तर माहिती सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांना व्हावी यासाठी कार्यकारी अभियंता दारव्हेकर आणि मूल येथील उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया यांनी मार्गदर्शन केले. International Right to Information Act 2005

भारतीय संविधानााच्या उद्देशिकाच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी अंतराराष्ट्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची निबंध व चित्रकला भाग घेतले. यामध्ये चित्रकलेला 10 स्पर्धक आणि निबंध स्पर्धेत 15 स्पर्धक होते त्यात उत्कर्ष कुंभरे याला स्मुर्ती चिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले इतर सर्व स्पर्धकांना प्रमाणापत्र देण्यात आले. Mul

कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार बोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभू चिवंडे, शैलेश माहूरपवार, आशिष बधखल, सिद्धार्थ गोडबोले, प्रणाली पिंपळशेडे यांनी अथक परिश्रम घेतले.  M.S.E.T.C.L.