फुलझरी गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : संतोषसिंह रावत

काँगेस पक्ष गावकऱ्यांच्या पाठीशी
मूल :  वन्यप्राणी आणि वनविभागाच्या रोषाला फुलझरी येथील नागरिक त्रासून गेल्याने आमचे पुनर्वसन करा अशी मागणी तेथील नागरिकांनी केली, याबाबत काँग्रेस पक्ष फुलझरी येथील नागरिकांच्या पाठीशी नेहमीच असून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करु अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिली, ते फुलझरी येथील नागरिकांनी अयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
सभेला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, जानाळा ग्रामपंचायत च्या सरपंच रंजना भोयर उपसरपंच दर्शना किंन्नाके सदस्य रवींद्र मरापे उपस्थित होते.
मागील अनेक वर्षपासून पिढ्यानंपिढ्या येथील काही शेतकरी धान व इतर पीक घेऊन उदरनिर्वाह करीत आहे मात्र वनविभाग येथील शेतकऱ्यांना पिक घेण्यास विरोध करीत आहेत.  वनविभागानी आम्हला धान पिक घेण्यासाठी बंधन करु नये अन्यथा आम्ह्चे पुनर्वसन करा अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली.
सभेला फुलझरी येथील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते