मूल तालुक्यातील काटवण क्षेत्रातील घटना
मूल (प्रतिनिधी) : शेळ्या चराईसाठी नेलेल्या शेरक्यावर डब्बा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना मूल तालुक्यातील बफर क्षेत्रातील bafer forest काटवन कक्ष क्र. 756 मध्ये गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजता दरम्यान घडली. देवाजी वारलु राऊत (50) रा. चिचोली असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या शेरक्याचे नाव आहे. Devaji raut mul
मूल तालुक्यातील चिचोली येथील देवाजी वारलू राऊत हे घरच्या शेळ्या चराईसाठी काटवण परिसरात गुरुवारी नेले होते, दरम्यान डब्बा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले घटनास्थळी बफर क्षेत्राचे वनपरीक्षेत्राधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र सहा. गजानन वरगंटीवार, वनरक्षक बंडू परचाके, बुरांडे यांनी भेट देवुन पंचनामा करून पार्थिव मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. Tiger attack
वनविभागाने सदर वाघ पत्तेदार की बिबट याचा शोध घेण्यासाठी कॅमेरे लावण्यात आल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी कारेकर यांनी सांगीतले. मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत 20 हजार रुपये देण्यात आली.
मृतकाचे पश्चात पत्नी आणि मूल आहेत. काटवन परीसरात यापुर्वीही वाघाने हल्ला करुन तीन ते चार जणांचा जीव घेतला आहे. त्यामूळे परीसरात दहशत पसरली आहे.,