महाविकास आघाडीमध्ये इच्छुकाची भाऊगर्दी Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मुनगंटीवारांचे दौरे वाढले

भोजराज गोवर्धन, मूल
सतत 15 वर्षापासुन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या सुधीर मुनगंटीवार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहतील यात शंका नाही पण त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. क्षेत्राचे आमदार व राज्याचे कॅॅबिनेट मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे दौरे क्षेत्रात वाढल्याचे दिसत आहे.  Ballarpur Assembly Constituency

लोकसभा आणि विधानसभा मतदार संघ परिसीमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदार संघाच्या रचनेनुसार बल्लारपूर विधानसभा मतदार संघ 72 तयार करण्यात आले, बल्लारपूर मतदार संघात चंद्रपूर जिल्हयातील मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर हे तालुके व चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर आणि चंद्रपूर रयतवारी या महसुल मंडळाचा समावेश आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघामध्ये सन 2009 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान वन, सांस्कृतीक कार्य आणि मस्त्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी जवळपास 25 हजार मतांची लिड घेवुन विजयी झाले. राहुल पुगलिया यांना त्यांनी पराजीत केले होते, 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही 43 हजार 600 मतांची लिड घेवुन विजयी झाले होतेे, 2019 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत मुनगंटीवार यांना 86002 मते मिळाली, कॉंग्रेंसचे डॉ. विश्वास झाडे यांना 52762 मते मिळाली तर वंचितचे राजु झोडे यांना 39958 मते मिळाली होती, यावेळी मुनगंटीवार यांनी 33240 मतांची लिड मिळाली होती. Cabinet Minister Namdar Sudhir Mungantiwar

नुकताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत क्षेत्राचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुक लढविली होती, यामध्ये कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराजय केला, गृह क्षेत्र असलेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन नामदार मुनगंटीवार यांना जवळपास 48 हजार मते कमी मिळाली, यामुळे महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत.  MP Pratibha Dhanorkar

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जात फॅक्टर चालल्यास महायुतीच्या उमेदवारला धोका आहे, परंतु विकासाच्या मॉडेलचा विचार मतदारांनी केल्यास महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चीत आहे. सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच अध्यक्ष संतोषसिंह रावत, ओबीसी नेत्या, तथा भुमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शक डॉ. अभिलाषा गावतुरे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे सर्क्रिय झाले असुन गावोगावी भेट देवुन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारासोबत इतरही नेत्यांनी एकसंघ होवुन काम केल्यास महायुतीच्या उमेदवाराला धक्का बसण्याची शक्यता आहे. परंतु महाविकास आघाडीत बल्लारपुर विधानसभा क्षेत्रात गटबाजीचे राजकारण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. Santosh Singh Rawat, Dr. Abhilasha Gavture, Ghanshyam Mulchandani, Prakash Patil Markwar, Sandeep Girhe