मूल तालुक्यातील भेजगाव येथील घटना
निनाद शेंडे मूल : स्वतःच्या शेतात निंदन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर विज पडल्याने ती जागीच ठार झाल्याची घटना भेजगांव Bhejgaon Mul शेतशिवारात गुरूवारी दुपारी 2.30 वाजता दरम्यान घडली. लताबाई बंडु चटारे वय 55 वर्षे रा. भेजगाव असे विज पडुन ठार झालेल्या माहिलेचे नांव आहे. Latabai Bandu Chatare
मूल तालुक्यातील बहुतांष शेतकऱ्यांनी शेतात रोवणीची कामे पुर्ण केलेली आहे. त्यामुळे निंदन काढण्याचे काम शेतकरी सुरू केलेले आहे. दरम्यान गुरूवारी (दि. 29 ऑगष्ट रोजी) दुपारच्या सुमारास वादळवाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली, यावेळी भेजगाव येथेही मोठया प्रमाणावर पाऊस पडला. दरम्यान निंदन करण्यासाठी स्वतःच्या शेतात गेलेल्या लताबाई बंडु चटारे वय 55 वर्षे रा. भेजगांव ही निंदन काढत असतांना तिच्यावर विज पडल्याने ती जागीच ठार झाली. जवळपासच्या शेतकऱ्यांनी सदर घटनेची माहिती गावात दिली. Woman killed by lightning
मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे यांच्या आदेशानुसार भेजगांवचे तलाठी भास्कर मेश्राम आणि याटावार यांनी घटनास्थळाला भेट देवुन पंचनामा केला. तर पोलीस पथकही घटनास्थळावर दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.