विजय सिध्दावार यांची डिजीटल मिडीयाच्या पुरस्कारासाठी निवड Nominations for Digital Media Awards

Vijay Sidhawar
Vijay Sidhawar

रविवारी होणार सन्मानित

निनाद शेंडे, मूल : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतिने दिला जाणारा डिजीटल मिडीया (पोर्टल) चा पुरस्कार यंदा मूल येथील पत्रकार आणि पब्लिक पंचनामाचे संपादक विजय सिध्दावार यांना जाहिर झाला आहे. Vijay Sidhawar

श्रमिक पत्रकार संघाच्या वतिने दरवर्षी जिल्हयात उत्कृष्ठ लिखान करणाऱ्या  पत्रकारांना वेगवेगळे पुरस्कार देवुन त्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी. पुरस्कार वितरण सोहळा 11 ऑगस्ट रोजी मा.सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने, मत्स व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून हितवाद नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक कार्तीक लोखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती राहणार आहे. Award distribution ceremony

यावर्षी देण्यात येणारा कर्मविर पुरस्काराचे मानकरी वरिष्ठ पत्रकार संजय लोखंडे नागपूर व अशोक पोतदार भद्रावती यांना घोषीत करण्यात आला आहे. ग्रामीण वार्ता पुरस्कार देण्यात येणार आहे. ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार अनिल पाटील (वरोरा पुण्यनगरी), द्वितीय प्रशांत खुळे, (वरोरा तरुण भारत), तृतीय अमर बुद्धारपवार (नवरगाव, पुण्यनगरी), प्रोत्साहनपर पुरस्कार आमोद गौरकार, (शंकरपूर लोकमत), प्रशांत डांगे, (ब्रह्मपुरी महासागर) यांना दिला जाणार आहे. तसेच चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी शुभवार्ता पुरस्कार साईनाथ कुचनकर (लोकमत चंद्रपूर), मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार निलेश व्याहाडकर (दै. भास्कर, चंद्रपूर) शोध पत्रकारिता डिजिटल (पोर्टल) विभाग विजय सिद्धावार (पब्लिक पंचनामा मूल), उत्कृष्ट वृत्तांकन (टीव्ही) हैदर शेख (टीव्ही 18 लोकमत), वृत्त छायाचित्र पुरस्कार संजय बांगडे (लोकमत, सिंदेवाही) यांना घोषीत करण्यात आला आहे. Chandrapur

पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या  माजी पत्रकारांना गौरव परस्कार दिला जाणार आहे यात पंकज शर्मा, स्व. गजानन ताजणे, अरविंद खोब्रागडे, प्रशांत देवतळे यांचा समावेश आहे. Chandrapur Shramik Journalist Sangha