मूल-चंद्रपूर मार्गावरील घटना: मूल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
निनाद शेंडे, मूल : किराणा सामान घेण्यासाठी kagajnager कागजनगर तेलंगणा येथे गेलेल्या दुकानदाराने दुकान बंद असल्याने परत येत असताना नागाळा जवळ मूल येथील काही तरूणांनी लुटमार करून बेदम मारहाण केल्याची तक्रार मूल येथील किराणा दुकानदार पंकज सुरेश जुमडे वय 37 वर्षे रा. मूल वार्ड क्रं. 17 यांने मूल पोलीस स्टेशन येथे मंगळवारी रात्रौ 10 वाजता दरम्यान केली. तक्रारी वरून मूल पोलीसांनी कलम 311 भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Pankaj Suresh Jumade
पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार मूल येथील किराणा व्यवसायी पंकज सुरेश जुमडे वय 17 वर्षे हा मंगळवारी कागजनगर येथे किराणा सामान स्वस्त मिळत असल्याने आणण्यासाठी स्विप्ट चारचाकी वाहने गेला होता, दुकान बंद असल्याने तो परंत येत असताना मूल येथील निरज प्रसाद रायपुरे वय 38 वर्षे वार्ड क्रं. 17, तोहित आरीफ शेख वय 24 वर्षे रा. वार्ड क्रं. 17, सचिन श्रीराम लाकडे वय 37 वर्षे वार्ड क्रं. 12, शोएब वाजीदखान पठाण वय 28 वर्षे वार्ड क्रं. 11, गणेश मनोहर चव्हाण वय 29 वर्षे रा. वार्ड क्रं. 12, नौशाद पठाण, आकाश राम रा. मूल यांनी अर्टीगा चारचाकी वाहन मागुन येवुन स्विप्ट वाहनापुढे थांबवुन लोखंडी टॉमीने व इतर दोघांना लाताबुक्यांनी मारहाण करून जखमी केले व त्यांचे जवळील 70 हजार रूपये नगदी व दोन मोबाईल 20 हजार रूपये असा एकुण 90 हजार रूपयाचा माल लुटुन नेल्याची तक्रार पंकज जुमडे यांनी मूल पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीवरून निरज प्रसाद रायपुरे, तोहित आरीफ शेख, सचिन श्रीराम लाकडे, शोएब वाजीदखान पठाण, गणेश मनोहर चव्हाण यांनी अटक करून दोन दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे तर नौशाद पठाण आणि आकाश राम हे आरोपी अजुनतरी पोलीसांच्या हाती लागले नाही. Mul Police Station
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम, स. फौज उत्तम कुमरे, पोहवा भोजराज मुंडरे, सचिन सायंकार,ना.पो.अ चिमाजी देवकते, पो.अ शफिक शेख हे करीत आहे. फरार आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे.