वाढदिवसानिमीत्य पुरग्रस्ताना धान्यकिटचे वाटप Distribution of food kits to flood victims

Distribution of food kits to flood victims
Distribution of food kits to flood victims

निहाल गेडाम यांचा पुढाकार

संगिता गेडाम, मूल
गेल्या काही दिवसांपासुन सततच्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालेले आहे, अनेक गावे पाण्याने वेढलेले आहे, यामुळे अनेक जिवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, यामुळे वाढदिवसानिमीत्य अवाढव्य खर्च करण्याचे टाळुन निहाल गेडाम या युवकांने मूल, चिचपल्ली व पिंपळखुट येथील जवळपास 80 पुरग्रस्तांना धान्यकिटचे वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेले आहे. food kits#chichpalli#Pimpalkhut#Mul

चंद्रपूर जिल्हयात 10 ते 12 दिवसांपासुन सततधार पाऊस सुरू आहे, चिचपल्ली आणि पिंपळखुट यागावातील तलाव फुटल्याने संपुर्ण गावे जलमय होवुन अनेक कुटुंबियांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शासनाकडुन वेळेवर मदतही मिळाली नसल्याने युवा क्रांती संघटनाचे पदाधिकारी असलेल्या निहाल गेडाम यांनी आपला जन्मदिवस साजरा न करता गरजु व पुरग्रस्तांना धान्यकिट व नियमित लागणाऱ्या  वस्तु भेट म्हणुन दिली. Nihal Gedam’s birthday

धान्यकिट व नियमित लागणाऱ्या  वस्तूचे वाटप करताना युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रणित पाल, उपाध्यक्ष निखिल वाढई, सौरभ वाढई, किशोर चौखुंडे, हर्षल दुपारे, सुमित दुपारे, अक्षय दूम्मावार, अजिंक्य लोखंडे, आकाश मोहूर्ले, अंकित गेडाम उपस्थित होते. Youth Revolution Organization