शासनाने नुकसान भरपाई देण्याची कंत्राटदाराची मागणी
सिंदेवाही (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या दोन दिवसांपासुन सततधार पाऊस सुरू असल्याने संपुर्ण जनजिवन विस्कळीत झालेले आहे. नदी, नाले तुडुंब भरून वाहत असतानाच नलेश्वर जलाशयात पाणी ओव्हरफ्लो झाल्याने कंत्राटदारानी तलावात सोडलेली मच्छी वाहुन गेल्याने जवळपास लाखो रूपयाचे नुकसान झालेले आहे. झालेली नुकसानीचे पंचानामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी कंत्राटदाराने प्रशासनाकडे केली आहे. Loss of lakhs of rupees due to drifting fish
सिंदेवाही तालुक्यातील इंग्रजकालीन तलाव असलेल्या नलेश्वर येथे मोठया प्रमाणावर मच्छी पालन केले जाते. Maharashtra Fisheries Development Corporation Limited Mumbai पाटबंधारे विभागामार्फत येणारे हे तलावाचे कंत्राट चन्नावार या कंत्राटदारानी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादीत मुंबई मार्फत तलावाचे कंत्राट घेतलेले आहे. त्यानुसार त्यांनी मागील वर्षी मत्स्य बिज सोडलेले होते, जवळपास 10 ते 12 किलोच्या मच्छी या तलावात आहेत मात्र मागील दोन दिवसांपासुन सततधार पाऊस आल्याने तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तलावातील मच्छी वाहुन गेल्याने कंत्राटदाराचे लाखो रूपयाचे नुकसान झालेले आहे. Naleshwar Reservoir Sindewahi
तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाटबंधारे विभागाने सिमेंट कॉक्रीट कॉलमवर लावलेले पाणी मापक यंत्रही पाण्याने वाहुन गेलेेले आहे. सततधार पाण्यामुळे जवळपास 50 लाख रूपयाचे कंत्राटदारचे नुकसान झालेले असुन झालेली नुकसान भरपाई शासनाने दयावी अशी मागणी कंत्राटदार चन्नावार यांनी शासनाकडे केली आहे. Irrigation Department