हळदी येथील बोदलकर कुटुंबियांची संध्याताईंनी घेतली भेट sandhyatai gurnule

कुटुंबियांचे सात्वन करून केली आर्थीक मदत

संगीता गेडाम मूल : तालुक्यातील हळदी येथील राजेश बोदलकर यांची शनिवारी हत्या करण्यात आली होती, अत्यत शांत व्यक्तींचा निष्पाप बळी गेल्याने त्यांचे कुटुंबिय संकटात सापडले होते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी त्यांची भेट घेवुन सात्वन करीत आर्थीक मदत केली व भविष्यातही मदत करण्याची ग्वाही दिली. Murder#haldi

6 जुर्ले रोजी दुपारच्या सुमारास राजेश बोदलकर bodalkar यांची शुल्लक कारणावरून गावातील मुलगा-वडीलांनी निर्घुण हत्या केली. 35 वर्षीय घरचा कर्ता पुरूषाची अचानक हत्या झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. यामुळे भाजपाच्या तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी गुरूवारी कुटुंबियांची भेट घेत सात्वन करीत आर्थीक मदत केली, यावेळी मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पाटील चुधरी, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, भाजपाच्या ओबीसी सेलचे मूल शहराध्यक्ष  युवराज चावरे उपस्थित होते. Sandhyatai गुरनुले, amol chudhri, loknath narmalwar, yuvraj chawre