लाभार्थ्यांना मोठा दिलासा
✍️ नुतन गोवर्धन, मूल संजय गांधी निराधार योजना समितीची सभा येथील तहसील कार्यालयात समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी 158 प्रकरणे मंजुर करण्यात आली आहे. यामुळे निराधार लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासनाने वृध्दापकाळ, अपंग, विविध व्याधीने ग्रस्त असलेल्या व नियमात बसत असलेल्या गरजु निराधार व्यक्तीसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृध्दापकाळ योजना,, इंदिरा गांधी विधवा योजना इंदिरा गांधी अपंग योजना अमलात आणल्या आहेत. यायोजनेचा लाभ नागरीकांना मिळावा यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती मूलचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी 22 डिसेंबर रोजी समितीची सभा घेवून 158 नविन प्रकरणाना मंजुरी दिली. यामध्ये श्रावणबाळ 77, वृध्दपकाळ 57, संजय गांधी 14, इंदिरा गांधी विघवा 6, इंदिरा गांधी अपंग 3 असे 158 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. त्रुटया असलेले प्रकरणेही त्रुटया पुर्ण झाल्यानंतर त्यावर चर्चा करून निकाली काढण्यात येणार आहे.
कोविड 19 च्या प्रादुर्भामुळे कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले असल्यास कुटुंबाना 50 हजार रूपयाचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. संबधित कुटुंबियानी अर्ज सादर करण्याचे आवाहन समितीकडुन करण्यात आले आहे.
शासनाकडुन अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यामुळे निधी उपलब्धतेसाठी समितीच्या वतिने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांचे खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल लाभार्थ्यांनी गैरसमज करून नये असेही आवाहन समितीने केले आहे.
सभेला संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, नायब तहसीलदार ठाकरे, नगर पालीकेचे प्रशासकीय अधिकारी तुषार शिंदे, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दशरथ वाकुडकर, संजय गेडाम, सुनिल शेंडे, सत्यनारायन अमदुर्तीवार, अर्चना चावरे, संबधीत लिपीक गिरडकर उपस्थित होते.
दलालापासून सावधान : राकेश रत्नावार
योजनेचे लाभ मिळवुन देण्याचे आमीष दाखवुन नागरीकांकडुन काही दलाल पैसे घेत आहेत, मात्र यासाठी कोणालाही पैसे देवु नये, अशा दलालापासुन नागरीकांनी सावध राहावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केले आहे.