नागरीकांची मोठी गर्दी
पोंभुर्णा (प्रतिनिधी) : पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथे मागील काही दिवसांपासुन वाघाच्या घटना घडत आहेत, गुरूवारी दुपारी 11 वाजता दरम्यान वाघाने एका शेळीला पकडुन ठार केल्याची घटना घडली, नागरीकांनी वाघाला हाकलण्यचा प्रयत्न केले असता तो पुलात जाऊन अटकला. याबाबत नागरीकांनी वनविभागाला माहिती दिली, वनविभागाच्या टिमला वाघ पकडण्यास यश आले आहे.
पोंभुर्णा तालुक्यात दररोज वाघाच्या घटना घडत आहेत, आजही वाघांची दहशत कायम आहे. आज (गुरूवारी) दुपारी अकरा वाजताच्या सुमारास वाघाने एका शेळीला पकडुन ठार केले याची माहिती गावकरÚयांना होताच त्या वाघाला पळवून लावण्यासाठी गावकरी एकत्र आले आणी वाघाला पळवून लावले.वाघ पळुन जाताना चेक आष्टा येथील पाटाच्या पुलामध्ये घुसला आणि मध्येच अडकला. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली. पाईप मधील जाणारा रस्ता बंद करण्यात आला. वाघ पुलीया मध्ये असल्याची माहिती तालुक्यात वार्यासारखी पसरली . .वाघाला जेरबंद करण्यासाठी रेस्कु टिम घटनास्थळी दाखल झाली. वाघाला या पुलाच्या बाहेर काढण्यासाठी वनविभागाने जेसीबी आणली, रस्त्याचे खोदकाम करण्यात आले, वाघाला पकडण्यासाठी पिंजरा आणण्यात आला. अखेर अथक परिश्रमानंतर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या टिमला यश आले.