मूल पोलीस स्टेशनचा पुढाकार
मूल (प्रतिनिधी): बेबारस स्वरूपात व म दा का गुन्हातील निकाल लागलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनाचा जाहिर लिलाव मूल पोलीस स्टेशन येथे 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान करण्यात येणार आहे, इच्छुकांनी मूल पोेलीस स्टेशन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश परतेकी यांनी केले आहे. Public auction of two wheelers, four wheelers
मूल पोलीस स्टेशन अंतर्गत सन 2016 ते 2023 दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीत बेबारस स्वरूपात व म दा का गुन्हातील निकाल लागलेल्या 14 दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा जाहिर लिलाव 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये बोलेरो एस एल, 22 व्ही टी टी डिकोर, फोर्ड आयकॉन, मारूती सुझुकी कार, हिरो होन्डा पॅशन प्लश, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, यामा कुक्स, हिरो पॅशन प्रो, व्हिक्टर टीव्हीएस जीएस, कायनॅटिक बॉस, स्कुटर बजाज यावाहनचा समावेश आहे. Police Inspector Satish Prateki of Mul Police Station
सदर दुचाकी आणि चारचाकी मोटारसायकल बेवारस मिळुन आल्याने व वाहनधारकाने परत न नेल्याने मोटारसायकलचे शासकीय नियमानुसार लिलावाची प्रक्रिया पुर्ण करून पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहिर लिलावाची प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. इच्छुकांनी लिलावाच्या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी केले आहे. Superintendent of Police Dr. Ravindra Singh Pardeshi, Sub Divisional Police Officer Mallika Arjun Ingle