उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदे त्वरीत भरा : मंगेश पोटवार Fill vacancies quickly

Fill vacancies quickly
Fill vacancies quickly

जिल्हा शल्यचिकीत्सकांना निवेदन

मूल (प्रतिनिधी) : रूग्णांची वाढतील संख्या लक्षात घेता मूल येथे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालयाची निर्मीती करण्यात आली आहे. मात्र रिक्त पदाचे ग्रहण अजुनही कायम आहे. यामुळे रूग्णांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टींचे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचेकडे केली आहे. Fill vacancies quickly

Fill vacancies quickly1
Fill vacancies quickly1

मूल तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव गायकवाड यांच्या पुढाकारातुन सन 2005 मध्ये मूल येथे 50 खाटाचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालय तयार करण्यात आले. दरम्यान उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून तज्ञ डॉक्टरांकडुन रूग्ण सेवा दिली जात होती. मात्र कालांतराने येथील उपजिल्हा रूग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर इतरत्र हलविण्यात आल्याने येथील अनेक रूग्णांना चंद्रपूर व इतर ठिकाणी उपचारार्थ हलविण्यात येत आहे. NCP taluka president Mangesh Potwar met the district surgeon

उपजिल्हा  रूग्णालयात  एकुण  48 पदे मंजुर होती  त्यापैकी  2 वैद्यकीय   अधिकारी  आणि  3 अधिपरिचारीकाचे पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात आलेली आहेत तर 13 पदे अजुनही रिक्त आहेत. मूल उपजिल्हा रूग्णालयात दररोज सहाशेे ते सातशे रूग्णांची नोंदणी होत असतानाही डॉक्टर आणि कर्मचाÚयांची पदे रिक्त असल्याने रूग्णसेवेचे तिनतेरा वाजत आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षकासह सर्जन 1, भुलतज्ञ 1, फिजीशियन 1, कारभारी 1, वरिष्ठ लिपीक 1 कक्षसेवक 1, वर्णोपचारक 1, शस्त्रक्रिया गृहपरिचारक 1 दंत सहाय्यकाचे 1 पद अजुनही रिक्त आहेत. मूल उपजिल्हा रूग्णालयात तात्काळ रिक्त पदे भरण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करून असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर उपस्थित होते. Nitin Bhatarkar Akash Yesankar