कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पाठोपाठ आता भाजपा तालुकाध्यक्ष बदलाचे वारे सरू taluka president will shift

taluka president will shift
taluka president will shift

मूल तालुका राजकीय राजरंग

भोजराज गोवर्धन, मूल
लोकसभा, विधानसभेची निवडणुक 2024 मध्ये होणार असुन, त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांचीही निवडणुक 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना तालुकाध्यक्ष बदलविले, आता मात्र भाजपा वर्तुळातही भाजपा तालुकाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असुन येत्या काही दिवसात भाजपाच्या तालुकाध्यक्ष संध्याताई गुरूनुले Sandhyatai Gurnule यांना जिल्हा स्तरावर बढती देवुन मूल तालुकाध्यक्षपदी जेष्ठ कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाणार असल्याची राजकीय गोठात खमंग चर्चा आहे. taluka president will shift

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात येवुन जवळपास दिड वर्षाचा कार्यकाल लोटुन गेला तर मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्ष, सदस्य पदांचा कार्यकाल पुर्ण होवुन बाविस महिणे लोटुन गेले, स्थानिक स्वराज्य संस्थेवर सध्या प्रशासकराज सुरू आहे, यामुळे नागरीकांचे अनेक कामे प्रलंबित आहे. पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेचीही निवडणुक होणार आहे, आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडुण यावा यासाठी कॉंग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि दोन्ही शिवसेनेने नविन गडी नवा डाव म्हणत नविन तालुकाध्यक्षांची नेमकणुक केली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पद यशस्वीपणे सांभाळणारे घनश्याम येनुरकर Ghanshyam Yenurkar यांना कॉंग्रेस पक्षाने जिल्हा कार्यकारणीमध्ये घेवुन पक्ष श्रेष्टीने कॉग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक गुरू गुरनले Guru Gurnule  यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन तालुकाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर Gangadhar Kunghadkar यांच्या जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. किसन वासाडे Kisan Wasade यांची नेमणुक केली आहे, तर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन येरोजवार Nitin Yerojwar यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या ठिकाणी अनेक वर्षापासुन तालुका शिवसेनेची यशस्वी धुरा सांभाळणारे चिचाळा ग्राम पंचायतचे सदस्य प्रशांत गट्टुवार Prashant Gattuwar यांची शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिÚहे sandip Girhe यांनी नेमणुक केली आहे. राज्यातील महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टी अजित पवार Ajit Pawar गटाचे तालुकाध्यक्ष म्हणुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश प्रतिनिधी, तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार Mangesh Potwar यांची निवड केली आहे तर शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष म्हणुन आकाश कावळे Akash Kawde यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वच पक्षानी नविन तालुका कार्यकारणी गठीत करून तालुकाध्यक्षाची निवड केली आहे. त्यांच्या पावलावर पाउल ठेवुन, आता भाजपानेही मूल तालुकाध्यक्ष संध्याताई गुरनुले यांना जिल्हा स्तरावर बढती देवुन नविन तालुकाध्यक्षांनी निवड केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याने अनेकांचे नांवे तालुकाध्यक्ष पदासाठी समोर येत आहे, परंतु कोणाच्या गळात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडेल हे मात्र अजुन तरी गुलदस्तात आहे.