मारोडा ग्राम पंचायतचा उपक्रम
प्रशांत मेश्राम
मारोडा : मूल तालुक्यातील ग्राम पंचायत मारोडा Maroda grampanchayat येथे स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत 1 ऑक्टोंबर रोजी ग्राम स्वच्छता व हात धुण्याचा कार्यक्रम पार पडला. Village cleanliness
सदर ग्राम स्वच्छताप्रसंगी मारोडा ग्राम पंचायतचे सरपंच भिकारू शेंडे, उपसरपंच अनुप नेरलवार, ग्रामविकास अधिकारी विनोद मेश्राम, पोलीस पाटील वाढगुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरद सहारे, वनहक्क समितीचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम, कृषी सहाय्यक यशवंत चट्टे उपस्थित होते.
यावेळी मारोडा ग्रामपंचायत परिसर, मंदिर परिसर, गाव तलाव परिसर, सार्वजनिक चौक, गावातील सार्वजनिक रस्ते स्वच्छ करण्यात आले. तसेच स्वच्छते नंतर हात धुण्याचा कर्यक्रम घेण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य, अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, महिला ग्राम संघांच्या महिला व बचत गटाच्या महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील नागरिक, वनविभागाचे कर्मचारी यांनी स्वयंस्फुर्ततेने सहभाग घेतला होता.