ताडाळा तुकुम शेतशिवारातील घटना
मूल (प्रतिनिधी) : शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्या वर दबा धरून बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाही सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतकऱ्या चे नांव आहे. Farmer killed in tiger attack
गेल्या दोन दिवसांपासुन मूल तालुक्यात मुसळधार पाऊस बरसल्याने संपुर्ण जनजिवण विस्कळीत झालेले आहे. दरम्यान मूल तालुक्यातील चिचाळा येथील शेतकरी सुर्यभान टिकले यांनी मौजा ताडाळा तुकुम शेतशिवारातील शेतात पाणी पाहण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकÚयावर झडप घेवुन जागीच ठार केले. आणि जवळपास 2 किमी पंर्यंत जानाळा जंगलातील कक्ष क्रं. 522 मध्ये ओढत घेवुन गेले. नागरीकांना सदर घटनेबद्दल माहिती होताच घटनास्थळावर गर्दी केली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, वनविभाग प्रादेशिक व वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गरूडे व बोथे, मूल येथील प्राणीमित्र उमेशसिंह झिरे, क्षेत्र सहाय्यक खणके, क्षेत्र सहाय्यक मस्के क्षेत्र सहाय्यक कूमरे, क्षेत्र सहाय्यक चौरे, वनरक्षक गुरनूले, मानकर उपस्थित होते घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदन करण्यासाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले..