चंद्रपूर जिल्ह्यात तांदूळ तस्करी जोरात Rice smuggling rampant

Rice smuggling rampant
Rice smuggling rampant

परराज्यीय टोळीचा शेगाव बु. पोलीसांनी केला पर्दाफाश

चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याची सीमा अनेक राज्यांना जोडण्याचे काम करते, त्यामुळे विविध वस्तूंची तस्करी सुद्धा दुसऱ्या राज्याची सीमा जवळ असल्याने तस्कराना सोपे जाते. मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात  शासकीय तांदळाची तस्करी केल्या जात आहे, Rice smuggling rampant  पोलिसांच्या सतर्कतेमुळे 17 ऑगस्ट रोजाी रात्रौ तांदूळ तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडण्यात आले. Out-of-state gang busted by Shegaon Buj police

जिल्ह्यातील शेगाव बु. पोलिसांना तांदळाची तस्करी करणारे वाहन चिमूर मार्गे छत्तीसगड राज्यात जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, पोलिसांनी रात्री च्या वेळी बंदोबस्त लावला असता त्यावेळी ट्रक क्रमांक सी जी 08 एसी 4500 संशयास्पद वाटले असता पोलिसांनी वाहन थांबविले. ट्रक ची तपासणी केली असता त्यामध्ये 31 टन तांदूळचे आढळून आले, पोलिसांनी वाहन चालक माणिकराव रामाजी कोचे वय 63 ला विचारणा केली असता त्याने स्वतःला कासारवाडी जिल्हा दुर्ग छत्तीसगढ येथील निवासी असल्याची माहिती दिली. हा तांदूळ कुठला व कुठं जात आहे याबाबत माहिती विचारली असता वाहनचालक कोचे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांना संशय आला असता त्यांनी मालकाला बोलवा असे वाहनचालकला सांगितले मात्र मालक आला नाही, सदर तांदूळ हा शासकीय गोदाम किंवा कंट्रोल चा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली, त्यांनी अन्न व पुरवठा निरीक्षक वरोरा यांना पाचारण करीत अहवाल मागितला, अहवाल आल्यावर सदर तांदूळ हा शासकीय असल्याची बाब उघडकीस आली. Smuggling of government rice in Chandrapur district

पोलिसांनी वाहन चालक व मालक यांच्यावर इसि ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला, सदर माल वरोरा तालुक्यातील माढेली येथील गोदामातील असल्याची माहिती मिळाली असून त्या गोदामाला सील करण्यात आले आहे, याआधी सुद्धा शासकीय तांदळाची तस्करी करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

चंद्रपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 31 टन तांदूळ किंमत अंदाजे 6 लाख वाहनांची किंमत 25 असा एकूण 31 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. याआधी किती वेळा तांदूळ तस्करी करण्यात आली, हा तांदूळ नेमका कुठून आला याबाबत पोलीस तपास करीत आहे. आरोपी हा राजकीय पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधू मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव चिमूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन शेगाव बू चे ठाणेदार अविनाश मेश्राम, पीएसआय सुरजुसे, एसआय पडोळे, हेड कॉन्स्टेबल मेश्राम, मदन येरने, पोलीस अंमलमदार निषाद राकेश , प्रफुल कांबळे यांनी केली.