पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
मूल (प्रतिनिधी) : प्रवाश्यांच्या सोयीसाठी करोडो रूपये खर्च करून मूल येथील सुसज्य बसस्थानकाचे काम अंतिम टप्पावर आहे, सुरक्षीत प्रवास करण्याच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करायला प्रवाश्याना आवडतो मात्र वेगवेगळे आमीष दाखवुन खाजगी वाहतुक करणाÚया वाहन चालक-वाहकांनी अगदी बसस्थानकाच्या पुढे खाजगी वाहन उभे करून प्रवाश्याना बोलवितात. बस स्थानकापासुन 100 मीटरच्या आत खाजगी वाहने उभे करण्यास प्रतिबंध असतानाही वाहतुक पोलीसांच्या आर्शिवादाने बस स्थानकाच्या जवळ खाजगी वाहने उभे करून प्रवाशी वाहनामध्ये कोंडुन नेत असल्याची विदारक चित्र मूल मध्ये पाहयला मिळत आहे. यामुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, सांस्कृतीक व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन मूल येथील बसस्थानकांच्या सौंदयीकरण व बांधकामासाठी करोडो रूपयाचा निधी मंजुर करून प्रत्यक्षात कामाचे भुमिपुजन केले, प्रवाशाच्या सोयीसाठी मूलच्या बसस्थानकाचे काम अंतिम टप्पावर येवुन पोहोचले आहे, मूल तालुका चंद्रपूर जिल्हयाच्या मध्यभागी असुन याठिकाणाहून रोज हजारो प्रवासी प्रवास करीत आहे. मूल येथुन चंद्रपूर, गडचिरोली कडे जाणाऱ्या टॅªव्हर्स, सिंदेवाही, चामोर्शी, गडचिरोली, पोंभुर्णा, चंद्रपूर, गोंडपिपरीकडे अवैध प्रवासी घेऊन जाणारे खाजगी वाहने मोठ्या प्रमाणावर अवैद्य प्रवासी घेऊन जात असतात मात्र पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. बसस्थानक जवळील 100 मीटरच्या आत खाजगी प्रवासी वाहणांना प्रवासी भरण्यास बंदी आहे मात्र मूल येथील बस स्थानकाजवळ खाजगी प्रवासी वाहनांमध्ये वाहतुक शिपायांच्या समोर प्रवासांना कोंडुन नेण्याचे प्रकार सुरू आहे. परंतु मूल पोलीसांचे याकडे पुर्णत्व दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.
मूल येथुन अवैद्य प्रवासी वाहतुक मोठ्याा प्रमाणावर होत असुन याठिकाणाहुन जाणाऱ्या अवैद्य प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याकडे खुद्द पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांनी लक्ष घालुन मूल शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे.