अवैध कत्तलखाण्यावर पोलिसांची धाड : दोन गोवंश कापलेल्या अवस्तेत जप्त Police raid on illegal slaughterhouse

Police raid on illegal slaughterhouse
Police raid on illegal slaughterhouse

धारदार अस्त्रांसह दोन आरोपी अटकेत : मुख्य आरोपी फरार

अतुल कोल्हे भद्रावती –  सुत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहिती नुसार १६ जून ला पहाटे स्थानिक डोलारा तलाव परिसरात गोवंश कापणार असल्याची माहिती पो. नि. इंगळे. यांना मिळाली, मिळालेल्या माहिती नुसार इंगळे यांनी त्याच्या चमु सह सापळा रचून सकाळी ६ वाजता अबू कुरेशी याच्या घरी धाड टाकली. या धाडीमध्ये दोन इसम शकील रहेमान शेख (४०) रा. भद्रावती व महोम्मद बिराम शेख (३२) रा. डोलारा हे दोघेही हातात धारदार शस्त्र घेवून गोवंश कापत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना अधीक विचारपूस केली असता सदर कृत्य अबू कुरेशी रा. डोलारा याच्या सांगण्यावरून मास विक्री करीता केले असल्याचे सांगितले. The main accused is absconding

अबू याच्या घराची झळती घेतली असता आणखी ३ जिवंत जनावरे तिथे आढळून आली. घटनास्थळी मिळालेल्या जनावरांबाबत विचारणा केली असता हि जनावरे अबू याच्या मांगली येथिल जंगल परिसरात गुप्त ठिकाणी असलेल्या फार्म हाऊस इथून आणले असल्याचे त्यांनी सांगितले . सदर फार्म हाऊस ची झळती घेतली असता तिथे आणखी १३ गोवंश बंदिस्त अवस्तेत आढळून आली. सदर गोवंशांना पंचाच्या समक्ष ताब्यात घेण्यात आले. अबू चे फार्म हाऊस इथून १३ व त्याचे अवैध कत्तलखाण्यातुन जप्त केलेले ३ अश्या १६ गोवंशाची किंमत एकूण १,१२,००० असून या सर्व गोवंशांना जैन मंदिर येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.

मुख्य आरोपी अबू कुरेशी रा. डोलारा याच्या सह शकील रहेमान शेख (४०) रा. भद्रावती व महोम्मद बिराम शेख (३२) रा. डोलारा या तिघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारणा सन १९७६ चे सुधारणा सण २०१५ चे कलम ५, ५ अ , ५ ब, ९, ११, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन ताब्यात असलेले आरोपी शकील रहेमान शेख व महोम्मद बिराम शेख या दोघांनाही मा.न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . मुख्य आरोपी अबू हा फरार असून भद्रावती पोलीस त्याचा कसून तपस करीत आहेत.

सदरची कारवाई भद्रावती पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विपीन इंगळे गुन्हे शोध पथकाचे सपोनि. विशाल मुळे, विश्वनाथ चुदरी, जगदिश झाडे, अनुप आष्टूनकर, निकेश ढ़ेंगे व मोनाली गारघाटे यांनी केली.