कृषक जमिनीवर लेआऊट टाकुण भूखंड विकण्याचा गोरखधंदा मूल शहरात तेजीत Layout on agricultural land

Layout on agricultural land
Layout on agricultural land

नगर पालीका प्रशासन झोपेत

मूल (प्रतिनिधी) : दलालाच्या संख्येत वाढ झाल्याने मूल तालुक्यात जमिनीच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे, एकच शेती, भूखंड पलटी मारून अनेकांना विक्री करण्याचा प्रकार राजरोषपणे सुरू आहे, त्यातच मूल शहरात कृषक जमिनीवर लेआऊट टाकुण भूखंड विकण्याचा गोरखधंदा मूल शहरात तेजीत सुरू आहे मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या मूल नगर पालीकेकडुन अशा अवैधपणे लेआऊट टाकुण भूखंड विक्री करणाÚयावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे याप्रकरणी आर्थीक व्यवहार झालेला तर  नसावा ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. Layout on agricultural land

मूल नगर पालीका क्षेत्रातील लोकसंख्येत दिवसेंिदवस वाढ होत असल्याने भूखंड खरेदी विक्रीचाही व्यवहार मोठया प्रमाणावर होत आहे, एकच भूखंड अनेकांना जास्त दरात विक्री करण्याचा सपाटा काही दलालामार्फत होत असल्याने अनेक दलाल आजही करोडो रूपयाच्या घरात  खेळत आहे. एकच भूखंड जास्त दरात विक्री करून देण्याचे आमीष काही दलालांकडून  दाखविल्या जात असल्याने भूखंडाचे दर गगणाला भिडले आहे. परंतु गरजु व्यक्ती भूखंड विक्री करीत नसल्याने आता मूल शहरातील लेआऊट मधील भूखंड विक्रीसाठी शिल्लक राहिलेले नाही, यामुळे आता कृषक शेतामध्येही लेआऊट टाकुण भूखंड विक्री करण्याचा प्रकार मूल शहरात राजरोषपणे सुरू आहे. सुमारे पाचशे रुपये  पासुन तर सातशे रूपये स्क्रेअर फुट पर्यंत कृषी लेआऊट मधील भूखंड विक्री केल्या जात आहे. 11 हजार रूपये घेवुन भूखंडाची बुकींग करण्याचे आमीषही लेआऊट धारकाकडुन दिल्या जात आहे. ‘येलो’ बेल्ट शेती असल्याशिवाय नियमानुसार  लेआऊट टाकता येत नाही मात्र कृषक शेतीवर मूल शहरात मोठया प्रमाणावर लेआऊट टाकुण भूखंड विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे, अशा लेआऊट धारकांना कुणाचे आर्शिवाद आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे.

नगर पालीकेकडुन प्लॉट विक्रीच्या जाहिरातीसाठी परवानगी
मूल नगर पालीका क्षेत्रात जाहिरात लावायची असल्यास नगर पालीकेकडुन रितसर परवानगी घेणे गरजेचे असते, मूल येथील कृषक लेआऊट धारकांनी मूल नगर पालीकेकडुन 25 जाहिरात बॅनर 7 दिवस लावण्यासाठी परवानगी घेतल्याचा प्रकार पुढे आला आहे. Permission for advertisement of plot sale

लेआऊट ला परवानगी नाही : मुख्याधिकारी
मूल नगर पालिकेकडून सदर लेआऊट ला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबत नागरिकानी कोणाशीही आर्थिक व्यवहार करु नये.
मुख्याधिकारी, नगर पालिका मूल

तलाठी कार्यालयात दलालांची रिघ
येथील प्रशासकीय भवनात असलेल्या तलाठी कार्यालयात शेती, भुखंड खरेदी विक्री करणाऱ्या दलालाची मोठी रिघ लागलेली असल्याचे बघायला मिळत आहे, त्या दलालांचे कामही याठिकाणी एक्सप्रेसच्या गतीने संबंधीत कर्मचाऱ्यांकडुन केले जाते, मात्र सामान्य व्यक्तींना ‘थोडया वेळ थांबा’ म्हणुन वाट पाहायला लावल्या जात असल्याची चर्चा आहे. यामुळे मूल शहरातील शेती, भुखंड खरेदी विक्री करणाऱ्या दलालांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे येत आहे.