मूल (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती राकेश रत्नावार आणि उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांनी आज सोमवारी पदभार सांभाळला. समितीच्या सभागृहात पदग्रहणाचा छोटेखानी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. Accepted the post of Chairman, Deputy Chairman of Agricultural Produce Market Committee
यावेळी समितीचे नवनिर्वाचित संचालक घनश्याम येनुरकर, संदीप कारमवार, अखील गांगरेड्डीवार, राहुल मुरकुटे, चंदाताई कामडी, जालींदर बांगरे, सुमीत आरेकर, अमोल बच्चुवार, किशोर घडसे आणि रमेश बरडे यांचेसह कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार उपस्थित होते.
अठरा सदस्यीय बाजार समितीवर कॉंग्रेसच्या वडेट्टीवार आणि रावत गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. सर्वप्रथम बाजार समितीचे सचिव अजय गंटावार यांनी राकेश रत्नावार यांनी सभापती तर राजेंद्र कन्नमवार यांनी उपसभापती पदाचा पदभार सांभाळण्याची कार्यवाही पुर्ण केली. पदग्रहण कार्यक्रमानंतर नवनिर्वाचित सभपती राकेश रत्नावार आणि उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांचेसह नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत करण्यांत आले. स्वागताच्या कार्यक्रमातानंतर मनोगत व्यक्त करतांना उपसभापती राजेंद्र कन्नमवार आणि सभापती राकेश रत्नावार यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि संचालक मंडळाने ज्या विश्वासाने समितीचे पद बहाल केले, त्याविश्वासाला तडा न पोहोचवता बाजार समितीवर अवलंबून असलेल्या सर्व घटकांची प्रगती आणि हितासाठी कार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल शेरकी यांनी तर आभार कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी मानले. कार्यक्रमाला समितीचे माजी संचालक शांताराम कामडे, धनंजय चिंतावार, मारोतराव चिताडे, राजु मारकवार, पुरूषोत्तम भुरसे, गुरू चौधरी, गंगाधर कुनघाडकर यांचेसह कॉंग्रेस, यवक कॉंग्रेस व महिला कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.