मूल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक रणसंग्राम
मूल (प्रतिनिधी) : 28 एप्रिल रोजी मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या APMC संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक Quinquennial Election of Board of Directors होवु घातलेली आहे. यानिवडणुकीमध्ये मतदान करणारे जवळपास 75 मतदार तिर्थयात्रेला गेलेे आहे. यामतदारांवर नेमकी कुणाची? कृपादृष्टी लाभलेली आहे याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहे, परंतु देव कुणाला पावणार हे मात्र निवडणुक निकालानंतर समोर येणार आहे.
18 सदस्य संख्या असलेल्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकारी संस्था मतदार संघातुन 11, ग्राम पंचायत मतदार संघातुन 4, अडत्ये, व्यापारी मतदार संघातुन 2 आणि हमाल मापारी मतदार संघातुन 1 सचालक निवडुण दयायचा आहे. यापैकी हमाल मापारी मतदार संघातुन रमेश बरडे हे अविरोध निवडुन आले आहे. 17 जागेसाठी 28 एप्रिल रोजी निवडणुक होणार असुन यासाठी 31 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे आहे.
चिन्ह वाटपावर शेतकरी विकास आघाडीचा आक्षेप Shetkari Vikas Aghadi
सहकार क्षेत्रासाठी अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीवर संतोष रावत गटाचे मागील अनेक वर्षापासुन वर्चस्व आहे. 5 वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपा मैदानात उतरली होती, मात्र यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी भाजपाचे बहुतांष उमेदवार माघार घेतल्याने रावत विरूध्द धानोरकर गटामध्ये निवडणुकीचा राजरंग पाहायला मिळणार आहे. निवडणुकीला 7 दिवस शिल्लक असतानाही सहकारी संस्था मतदार संघातील जवळपास 75 मतदार तिर्थयात्रेला गेल्याने होणारी निवडणुक एकतर्फी होणार की काय? असा सुर आता ऐकायला मिळत आहे. मात्र तिर्थयात्रेला गेलेल्या मतदारावर नेमकी कोणाची कृषादृष्टी लाभली हे चर्चेचा विषय ठरला आहे. शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी सहकारी संस्थेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या सदस्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पाश्वभुमिवर तिर्थयात्रेला जाणे कितपत योग्य आहे हा सुध्दा चिंतनाचा विषय ठरला आहे.