ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील रनमोचन (खरकाळा) येथील शेतकरी महिला सौ. कांताबाई सोमेश्वर दोनाडकर (48) आपल्या शेतावर काम करीत असतात अचानक आलेल्या रान डुकराने हल्ला केला त्यात सदर महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी Gramin Rugnalay Bramhpuri येथे दाखल केले आहे. Farmer woman injured in wild boar attack
सध्या ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात उडीद, मूग, जवस, लाख, हरबरा, गहू व अन्य पिकाची काढणी सुरू असल्यामुळे सकाळ पासून तर सायंकाळ पर्यत आपल्या कामात व्यस्त असतात. ब्रम्हपुरी Bramhpuri तालुक्यात वाघाचा व रान डुकराचा हैदोस आहे. वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर घटनेची माहिती गोवर्धन दोनाडकर Gowardhan Donadkar पत्रकार यांनी उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड Mahesh Gayakwad यांना दिली व लगेच कुठलाही विलंब न करता ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या मेंडकी श्रेत्रातील रनमोचन (खरकाळा) येथील घटनेची दखल श्रेत्र सहाय्यक सेदुरकर साहेब यानी दखल घेतली व पंचनामा करण्यात आले आहे. सदर शेतकरी महिला सौ. कांताबाई सोमेश्वर दोनाडकर याना वनविभागाने आर्थिक मदत दयावी अशी मागणी केली जात आहे. पुढील तपास वनविभागाने कर्मचारी करीत आहेत.