सफारी गेटच्या उद्घाटनाची पर्यटकांना लागली उत्सुकता

Somnath Gate
Somnath Gate

सोमनाथ सफारी गेटचे काम झाले पुर्ण

मूल (प्रतिनिधी) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ देवस्थानच्या जवळ पर्यटकांसाठी वनविभागाने सफारी गेट उभारले आहे,सफारी गेटचे काम पुर्ण होवुन जवळपास महिणा लोटला मात्र अजुनही उद्घाटन झाले नाही, यामुळे पर्यटकांना उद्घाटनाची उत्सुकता लागली आहे. Tourists wait for the opening of the gate

पर्यटकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासनाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नविन अनेक सफारी गेट तयार करण्यास मंजुरी दिली होती, त्यानुसार मूल तालुक्यातील बफर क्षेत्रातील सोमनाथ मंदीराजवळ सफारी गेट उभारण्यात आले आहे. सदर सफारी गेटचे काम मूल येथील वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नायगमकर G. R. Naygamkar यांच्या नेतृत्वात पुर्ण करण्यात आले आहे. The work of Somnath Gate has been completed

चंद्रपूर जिल्हा हा वाघाचा tiger जिल्हा म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात ओळख आहे, वाघ पाहण्यासाठी सेलिब्रीटी celebrity नेहमीच चंद्रपूर जिल्हात येत असतात, करोडो रूपयाचा निधी ताडोबा पर्यटकांकडुन शासनाला मिळत असतो, तरीही अनेक पर्यटकांना बुकींग ‘फुल’ राहात असल्याने त्यांना वाघ बघण्याचा आनंद घेता येत नाही, यामुळे पर्यटकांची वाढती संख्या बघता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये नविन अनेक सफारी गेटला मंजुरी दिली आहे, त्यानुसार सोमनाथ येथील सफारी गेटचे काम पुर्ण झालेले आहे. प्रशासनानेही सोमनाथ सफारी गेटच्या उदघाटनासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची बोलले जात आहे.

सफारी गेटचे काम पुर्ण, वरिष्ठांच्या आदेशानुसार सफारी गेट सुरू करू : वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नायगमकर
पर्यटकांसाठी सोमनाथ येथे सफारी गेट मंजुर झालेले होते, त्यागेटचे कामही पुर्ण झालेले आहे मात्र सदर सफारी गेट सुरू करण्याबाबत वरिष्ठांचे अजुन काहीही आदेश प्राप्त झालेले नाही, आदेश प्राप्त होताच सोमनाथ सफारी गेट सुरू करू अशी प्रतिक्रीया वनपरिक्षेत्राधिकारी  जि. आर नायगमकर यांनी दिली.