गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई

50 गोवंशीय जनावरांची सुटका: 6 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतुक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून ब्रम्हपुरी पोलीसांनी केलेल्या नाकाबंदीत 2 आयसर ट्रक  वाहनातुन 50 गोवंशीय जनावरांची सुटका करून गोरक्षण केंद्रात  जमा करण्यात आले. सदर कारवाईमुळे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यांचे  धाबे दणाणले आहे.#Illegal traffic of bovine animals

ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा भुज ते एकारा रस्ता दरम्यान दोन आयसर वाहनातुन अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतुक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली, माहितीवरून ब्रम्हपुरी पोलीसांनी नाकाबंदी करून अवैध जनावरांची वाहतुक होत असलेले दोन आयसर ट्रक क्रं. एम एच 40 सी डी 4917 व एम एच 40 सी डी 4013 थांबवुन झडती घेतली असता
दोन्ही वाहनात एकुण ५० गोवंश जनावरे किंमत 5 लाख रूपये, ट्रक किंमत 24 लाख रूपये असे एकुण 29 लाख रूपयांचा मुददेमाल आरोपींच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला. Bhuj to Ekara road incident

अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या एकुण ६ आरोपींविरूध्द कलम ५ (अ) (ब) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सहकलम ११ (डी) (एफ) प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम, सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम ८३/१७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सर्व जनावरे गोविंद गोशाळा, हळदा ब्रम्हपुरी येथे दाखल करण्यात आलेले आहे. A total of 29 lakhs of rupees seized

सदरची कार्यवाही मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन ईंगळे, पोलीस निरिक्षक रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुरेंद्र उपरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे, नापोशी तेजराम जनबंधु, पोहवा हरीदास सुरपाम, पोशी राजेश्वर धंदरे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि सुरेंद्र उपरे करीत आहे.# bramhapuri police stantion