कंपन्याकडून होतोय प्रदुषण नियमाचे तिनतेरा

 प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष  :  भाग 1
मंगेश पोटवार, मूल
आकापूर स्थित उभारण्यात आलेल्या विकास केंद्रात 4 ते 5 कंपन्याचे काम सुरू आहे, सदर कंपन्याकडुन प्रदुषण नियमाचे पालण होत नसल्याने विकास केंद्राच्या जवळील गावातील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड घ्यावे लागत आहे,
मूल तालुक्यातील रोजगाराची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, सदर समस्या दुर करण्याच्या दृष्टीने आकापूर येथे विकास केदं्राची निर्मीती करण्यात आली, यासाठी अनेक शेतकÚयांची जमीनी अधिग्रहीत करण्यात आले, याबदल्याने शेतकÚयांना अति अल्प मोबदला देण्यात आला, मोबदला वाढवुन मिळावा यासाठी काही शेतकÚयांनी न्यायालयाचे दार ठोठावले, तर काही शेतकÚयांना मोबदला वाढवुन मिळालेला नाही यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
शेतकऱ्याची शेती उधोगासाठी घेतल्यामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले यामुळे शेतकÚयांनी मुलाना कंपनीत नौकरी मिळेल याअपेक्षेत जगत होते मात्र शेतकÚयाची अपेक्षाभंग झालेली असून अनेक शेतकÚयाच्या मुलाना नौकरी देण्यास कंपनी प्रशासनाकडुन नकार दिल्या जात आहे. शासनाच्या स्थानिकाना रोजगार देण्याचे नियमाचे याकंपनी प्रशासनाकडून पध्दतशीरपणे धिंडवडे काढल्या जात असताना तालुक्यातील काही नेत्याकडून कंपन्याचे ‘दलाल’ बनुन कंपन्याची चापलुशी करून खिसे गरम करण्यात व्यस्त आहेत.
मूल विकास केंद्राअंतर्गत येत असलेल्या चिमढा, आकापूर, चितेगांव, मरेगांव आणि टेकाडी येथील नागरीकांना कंपनीच्या धुरासोबतच घ्वनी प्रदुषणाचा मोठा फटका बसलेला आहे, रात्रौच्या सुमारास जनावरे सुटुन जात आहे. मात्र कंपनी प्रशासन याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
क्रमशः
वायु, ध्वनी प्रदुषणामुळे गावातील नागरीकांचे हाल: सतिष चौधरी
कंपनीच्या चिमणीमधुन निधालेल्या धुरामुळे मोठया प्रमाणावर वायु प्रदुषण होत असून ध्वनी प्रदुषण होत आहे, नागरीकांना याप्रदुषणामुळे जिवन जगणे कठिण झालेले आहे, तालुका प्रशासनाने याकडे लक्ष देवून होणारे प्रदुषण थाबवावे अशी मागणी टेकाडीचे सरपंच सतिष चौधरी यांनी केली आहे.