ग्राम पंचायत आणि पोलीस स्टेशनचा पुढाकार
सुधाकर दुधे, सावली
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्य पाथरी येथील ग्राम पंचायत आणि पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेवुन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली असून केंद्र सरकारणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उस्ताहात साजरा करण्याचे ठरविले असून हर घर झेंडा ही संकल्पना मांडली असता सम्पूर्ण देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना सावली तालुक्यातील पाथरी येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी बाजार चौक पाथरी येथे 11 ऑगष्ट रोजी मार्गदर्शन कार्यक्रम तथा देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात सावलीचेे तहसीलदार परिक्षीत पाटील, नायब तहसीलदार कांबळे,, पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोडक, पाथरी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रफुल तुम्मे, राजेश सिद्धम, तुकाराम ठिकरे यांनी मार्गदर्शन करून देशभक्तीपर गीतांचा ऑर्केस्ट्राला सुरूवात करण्यात आले.
नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी 12 ऑगष्ट रोजी जनजागृती मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ग्रामपंचायत कार्यालय पाथरी, पोलीस स्टेशन पाथरी सम्पूर्ण शाळा, वनविभाग, तथा सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाÚयांनी सहभाग घेतला, भारत माता कि जय नारे देत पाथरी नगरी दुमदुमली, यामुळे पाथरी येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाथरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मोहोड, ग्रामपंचायत उपसरपंच प्रफुल तुम्मे, राकेश चेन्नूरवार, कमलेश वानखडे व ग्राम पंचायतच्या संपुर्ण टिमने अथक परिश्रम घेतले.