अवैध वृक्षतोड प्रकरर्णी लाईट मेटल कंपनीवर गुन्हा दाखल

चिचपल्ली वनविभागाची कारवाई

मूल (प्रतिनिधी) : वनविभागाची परवानगी न घेता वृक्षतोड केल्याप्रकरर्णी चिचपल्ली वनविभागाने मूल येथे काम करीत असलेल्या सुरजागड येथील लाईट मेटल अॅन्ड कंपनीवर वनगुन्हा दाखल Forest offense filed केला आहे. सदर प्रकरणी मूल येथे खळबळ उडाली आहे.

मूल येथील रेल्वे परिसरात माल धक्काचे काम मागील काही दिवसांपासुन सुरू आहे, याच परिसरातील मौजा विहीरगांव सर्व्हे नं. 216 मध्ये मोठया प्रमाणावर साग आणि इतर किसमचे मोठे वृक्ष आहे, सदर वृक्ष माल धक्काचे काम करीत असताना अडचण होत असल्याने कंपनीने वनविभागाची परवानगी न घेताच वृक्ष तोड केलेले आहे. The trees were cut down without the permission of the forest department सदर वृक्षतोड केलेल्या वृक्षाची किंमत 31 हजार 4,43 रूपये आहे. अवैध वृक्षतोड केलेल्या कंपनी विरूध्द वनविभागाने भारतीय वन अधिनियम 1927 चे अंतर्गत वन गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहा. वनसंरक्षक निकिता चौरे यांचे मार्गदर्शनाखाली चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे, मूलचे क्षेत्र सहा. एम. जे. मस्के, वनरक्षक सुभाष मरस्कोल्हे यांनी केली असुन जप्त माल मूल येथील बिट वनरक्षक यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे.