परवाना केवळ एक हजार ब्रासचे, वापर जवळपास पाच हजार ब्रास

तात्काळ पंचनामा करून कार्यवाही करण्याची शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील नवेगाव वाघाडे ते आष्टी मार्गाचे काम करणाऱ्या ए. कंट्रक्शन कंपनीने आतापर्यंत जवळपास पाच हजार ब्रास मुरमाचा वापर केला असून शासनाचा लाखोंचा महसूल बळवला असल्याचा आरोप करत चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी गोंडपिपरीचे तहसीलदार यांचेकडे केली आहे.

नवेगाव वाघाडे ते आष्टी मार्गाचे काम करणाऱ्या ए.  कंट्रक्शन कंपनीला केवळ 1000 ब्रास मुरूमाचा परवाना मिळाला असल्याची माहिती (माहिती अधिकारातून) मिळाली. परंतु त्या मार्गावर दुतर्फा रस्त्यावर रस्ता मजबुतीकरणासाठी वापरलेला मुरूम हा जवळपास 5 हजार ब्रास असल्याची शक्यता आहे. महसुल प्रशासनाने सदर मार्गावरील मुरूमाचा पंचनामा करून चौकशी करावी व दोषी आढळल्यास कार्यवाही करावी सोबतच ज्या ठिकाणावर उत्खनन करण्याची परवानगी दिली, त्या ठिकाणावर देखील मोजमाप करण्यात यावे अशी मागणी गोंडपिपरीचे शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.