अपघातग्रस्ताला केली गावकऱ्यांनी आर्थिक मदत

नागरिकांचे मानले आभार

गडचांदूर (प्रतिनिधी) :  कामानिमित्य बाहेरगावी जाऊन परत येत असताना कुकुडसाथ येथील शेखचंद अशोक खामनकर याचा दुचाकी वाहणाने अपघात झाला, परिस्थिती बिकट असल्याने त्याच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी आर्थिक मदत जमा करुन त्याला सुपूर्द केलेली आहे. यामुळे त्याला उपचार करण्यास मदत होत असल्याने त्यांनी नागरिकांचे आभार मानले.

गडचांदूर येथून जवळच असलेल्या कुकूडसाथ येथील शेखचंद अशोक खामनकर हा महत्वाचे कामाकरिता राजुरा येथे गेले होता काम आटोपुन घरी येत असतांना रात्री ९ वाजताच्या सुमारास चंदनवाही हरदोना बु.च्या मधात त्यांचा अपघात झाला त्यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे त्यांना गावकऱ्यांनी वीस हजार चारशे दहा रुपये वर्गणी गोळा करून दिल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे याबद्दल शेखचंद खामनकर व नातेवाईकांनी गावकऱ्यांचे आभार मानले