पहिल्याच प्रयत्नात केले सेट परीक्षा उत्तीर्ण
प्रमोद मेश्राम चिमूर : तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पिपर्डा या गावातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी तुकाराम लक्ष्मण बोरकर त्याची बहीण कु रूपा लक्ष्मण बोरकर या बहीण भावाने पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण होत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.
तुकाराम यांनी प्राथमिक शिक्षण पिपर्डा इथे घेतले माध्यमिक शिक्षण वाढोणा इथे घेतले पदव्युत्तर शिक्षण गडचिरोली येथे घेतले आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात वनस्पती शास्त्र या विषयात पात्रता परीक्षा सेट च्या परीक्षेत यश संपदान केले आहे. त्यांची बहीण रुपा लक्ष्मण बोरकर तिने पण प्राथमिक शिक्षण पिपर्डा इथे घेतले महाविद्यालयिन शिक्षण सर्वाेदय विद्यालय सिंदेवाही इथे घेतले त्यांनी रसायनशास्त्र या विषयात पात्रता परीक्षेत यश मिळविले आहे .रूपां हिचे पदव्युत्तर शिक्षण अमरावती इथे घेतले असून ती सुद्धा पहिल्याच प्रयत्नात सेटच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे.
पदवी शिक्षण घेत असताना तसेच पदव्युत्तर शिक्षण घेत असताना दोन्ही बहीण भाऊ एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्याचाच फायदा म्हणून त्यांनी सेट परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण करून यश प्राप्त केले, यामुळे त्यांचे सर्वच अभिनंदन केले जात आहे. यशप्राप्त बहीन भावानी आपल्या यशाचे क्षेत्र आई, वडील, काका, बत्रे सर, दिवासे सर यांना दिले, .