१५ प्रकरणे नामंजूर
कोरपणा (प्रतिनिधी) : .संपूर्ण देशात कोरोना महामारीचे संकट पुन्हा आले असतांना निराधारांना आधार देण्यासाठी कोरपना तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष उमेश राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय कोरपना येथे २५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता बैठक संपन्न झाली. या बैठकीत 157 प्रकरणाला मंजुरी देण्यात आली तर 15 प्रकरणे नामंजुर करण्यात आले.
सदर बैठकीत संजय गांधी विधवा व अपंग योजने अंतर्गत ४७, श्रावणबाळ योजने अंतर्गत ६२, इंदिरा गांधी विधवा योजने अंतर्गत ९, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेअंतर्गत ३५ आणि दुर्धर आजार परितक्त्या सिकलसेल घटस्पोटीत योजने अंतर्गत ४ प्रकरणे मंजुर करण्यात आली.
सभेला समितीचे अध्यक्ष उमेश राजूरकर, पदसिद्ध सचिव तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर, नायब तहसीलदार प्रवीण चिडे, अव्वल कारकून राजेश ढोबळे, निशा सोयाम, देवा थेटे, प्रणिता मालेकर, अशासकीय मिलिंद ताकसांडे, अंकुश वांढरे, कल्पना निमजे, सुहेल अली अब्दुल हाफीज अब्दुल गणी, प्रमोद पिंपळशेंडे, विलास आडे, अनिल निवलकर, रेखा घोडाम आदी उपस्थित होते.
निराधार व्यक्तीनी प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे : उमेश राजुरकर
त्रुटी अभावी नामंजूर झालेल्या प्रकरणाची पूर्तता ऑनलाइन सेतूमध्ये जाऊन करावी तसेच अंध अपंग मतिमंद विधवा परितक्त्या वृद्ध सिकसेल दुर्धर आजार यांनी जास्तीत जास्त प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर यांनी केले