कोरोना लसीकरणाची नोंदणी करणारे संगणक परिचालक मानधनापासून वंचित

तात्काळ मानधन वाटप करण्याची मागणी

चंद्रपूर (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस कोरोना संक्रमणामध्ये वाढ होत आहे, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी गावागावात लसीकरण शिबीर घेण्यात आले. याशिबीरात येणाÚया नागरीकांची नोंदणी करण्यासाठी संगणक परिचालकाची नियुक्ती केली, कित्येक महिणे संगणक परिचालकानी काम केले मात्र अजुनही त्याना मानधन वाटप करण्यात आलेले नाही,

जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर शासनाने हाती घेतेलले असून प्रत्येक गावामध्ये शिबीर घेऊन लसीकरण केले जात आहे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सदर लसीकरण करताना नागरिकांचे लसिकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणाऱ्या संगणक परीचकाची नियुक्ती करण्याबाबत पत्र काढलेले होते, दरम्यान त्यांना दिवसाला प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे मानधनही ठरविण्यात आलेले होते त्यानुसार जिल्हयातील संगणक परिचालक जिव धोक्यात टाकून प्रामाणिकपणे लसीकरण नोंदणीचे काम करीत आहेत परंतु मागील आक्तोंबर 2021 पासून जिल्ह्यातील संगणक परीचालकाना मानधन मिळाले नसल्याने त्यांच्या मनामध्ये शासनाप्रती असंतोष निर्माण झालेला दिसत आहे.

जिल्ह्यातील काही तालुक्यातील संगणक परिचालक संघटनेने तालुक्यावर पत्रव्यवहार करून लसीकरणाच्या कामावर बहिष्कार टाकलेला आहे त्यामुळे केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने जिव धोक्यात टाकून नोंदणीचे काम कशाला करायचे असा प्रश्न संगणक परिचालकांनी उपस्थित करीत तात्काळ मानधनाचे वाटप करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.