आपल्या क्षेत्रातील कार्यकर्तेच महिलांना देत आहेत प्रोत्साहन
भोजराज गोवर्धन, मूल
गेल्या चार-पाच दिवसांपुर्वीची घटना, मूल तालुक्यातील मौजा चांदापूर येथील उपसरपंच अशोक मार्गनवार यांच्यावर एका महिलेला मारण्यासाठी आपल्याच पक्षातील एका जबाबदार पदाधिकाऱ्यांनी प्रोत्साहन देत असल्याची चित्रफित तुफान वायरल होत आहे, सदर चित्रफितवरून आपल्या कार्यकर्त्यांना आवरण्याची आवश्यकता आहे. आपण स्वतः एखाद्या चुकीच्या प्रकरणात कायदाचे अवलंब करून नियमानुसार कार्यवाही करण्याची मागणी करता, परंतु तसे आपल्या कार्यकर्त्यांकडुन याप्रकरणावरून होतांना दिसत नाही. यामुळे आपणच आपल्या कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे. Ashok marganwar
मूल तालुक्यातील चांदापूर हे गांव राजकीय दृष्टया संवेदनशिल आहे, गावच्या सरपंच सोनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 25 फेबुवारी आणि 20 मार्च रोजी मासीक सभा पार पडली. यासभेत रिक्त असलेल्या शिपाई पदाच्या भरतीसंबधाने विषय चर्चेत आला, चर्चेअंती 25 मार्च रोजी लेखी परिक्षा घेण्याचे ठरविण्यात आले, दरम्यान लेखी परिक्षेचा पेपर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकडुन वेळेवर तयार करून दुपारी 1 ते 4 वाजेपर्यत व्हिडीओ शुटींगसह लेखी परीक्षा घेण्याचे निश्चीत झाले होते, 21 अर्ज ग्राम पंचायतकडे प्राप्त झाले होते. आणि निवड झालेल्या उमेदवाराला 1 एप्रिल पासुन रूजु होण्याचे आदेश देण्याचे सभेत ठरले होते. परंतु 25 मार्च रोजी सकाळी ग्राम पंचायतच्या नोटीस बोर्डावर सरपंच सोनी देशमुख यांनी लेखी परिक्षा रद्द करण्यात आल्याचे पत्र ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांमार्फत लावण्यात आले. soni deshmukh
सदर प्रकरणाची तक्रार उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी ग्रामपंचायतकडे करून, सदर भरती प्रकरणी आर्थीक हित साधण्यासाठी लेखी परिक्षा रद्द करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. दरम्यान 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान चांदापूरचे उपसरपंच अशोक मार्गनवार हे पिशवी घेण्यासाठी जात असताना लोमेश कडुकर व सुनिता कडुकर यांनी त्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करून आम्ही कधी पैसे खालो म्हणुन रस्त्यावर आडवे होवुन शिवीगाळ केली, यावेळी भाजपाच्या ओबीसी सेलचे पदाधिकारी तथा चांदापूरचे माजी उपसरपंच दिलीप पाल यांनी सुनिता कडुकर यांना चितावणी देवून याला चप्पलानी मारण्यासाठी सागत होते, चप्पल आणा याला मारा याला खाली पाड मी व्हिडीओ काढतो अशा प्रकारे सागत असलेली चित्रफित वायरल झालेली आहे. Sunita Kadukar, Dilip Pal
सुधीरभाऊ आपण क्षेत्राचे आमदार आहात, गेली अनेकवर्षे आपण मंत्री म्हणुनही राज्यात दमदार काम केलेले आहेत, आपण सर्वाना सौजन्याने वागण्याचा सल्ला नेहमी देत असता तरीही आपले कार्यकर्ते अशापध्दतीने महिलांना भडकविण्याचे काम करीत आहेत, अशांना आता आपल्याच पध्दतीने समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.