श्री. स्वामी समर्थ भक्तीसेवा समितीचा उपक्रम
निनाद शेंडे, मूल
श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समिती मूलच्या वतिने श्री स्वामी समर्थ महाराज जयंती सोहळयाचे आयोजन हनुमान मंदिर तलाव पाळ येथे रविवार आणि सोमवारला आयोजीत केला आहे. Mul
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका स्थापनेने पावन झालेल्या हनुमान मंदीर परिसरातील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदीराची उभारणी करण्यात आलेली आहे, सदर मंदीरामधुन रविवारी सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणुक शोभायात्रा काढण्यात येणार आहे, तर सोमवारी सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ पादुकांचे अभिषेक व पुजा, दुपारी 12 वाजता गोपालकाला, आणि सायंकाळी 4 वाजता पासुन सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. Shri Swami Samarth Maharaj
भाविकांनी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष नितीन येरोजवार, उपाध्यक्ष अशोक आक्केवार, सचिव विजय बट्टे, कोषाध्यक्ष किशोर गोगुलवार, सदस्य रमेश सिरस्कर, शोभाताई चवरे, जितेंद्र उपलेटा, दिवाकर केकुलवार यांनी केले आहे.