मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील केळझर ग्राम पंचायतच्या सरपंचपदी काजु मिलींद खोब्रागडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. केळझर ग्राम पंचायतच्या सरपंच पुनम रामटेके यांना अपात्र ठरविल्याने, रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या जागेसाठी 17 मार्च रोजी निवडणुक लावण्यात आली होती, यानिवडणुकीत बहुमताने काजु खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे. Gram Panchayat Kelzar
मूल तालुक्यातील अतिसंवेदनशिल ग्राम पंचायत म्हणुन केळझरकडे बघीतले जाते. मौजा केलझर ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडुक 15 जानेवारी 2021 रोजी पार पडली, अनुसुचित जातीसाठी राखीव प्रवर्गातुन काजु मिलींद खोब्रागडे हया विजयी झाल्या, 6 फेब्रुवारी 21 रोजी पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत काजु खोब्रागडे बहुमताने निवडुन आल्या. ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत सुरू असताना फ्रेबुवारी 2023 रोजी सरपंच खोब्रागडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारीत झाला. त्यांनतर 6 मे 2023 रोजी पुनम रामटेके यांची सरपंचपदीनिवड करण्यात आली. दरम्यान काजु मिलींद खोब्रागडे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालात प्रकरण दाखल केले. प्रकरणाचा तपास करून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रामटेके यांनी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) (ह), (ग) चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे पद रद्द केले होते. दरम्यान 17 मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत रिक्त असलेल्या सरपंचपदी काजू मिलिंद खोब्रागडे यांची बहुमताने निवड केली. पार पडलेल्या निवडणुकीत तहसीलदार मुल यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गोहने यानी अध्यासी अधिकारी म्हणुन कामगिरी बजावली. Punam Ramteke
केळझर ग्राम पंचायतमध्ये मोठया प्रमाणावर विकासकामे करू अशी प्रतिक्रिया सरपंच काजु खोब्रागडे यांनी दिली. kaju-khobragade