मूल पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देवुन चौकशी करण्याची केली मागणी
मूल (प्रतिनिधी): दुचाकीने चंद्रपूरकडे जाणाऱ्या दोन सख्या भावांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक देवुन फरार झालेल्या वाहनाचा तात्काळ शोध घेवुन कारवाई करण्याची मागणी राजु आकुलवार, शितल आकुलवार, सावन वाढई, अमोल टिप्रमवार यांनी मूल पोलीस स्टेशन येथे केली आहे. Mul Police Stetion
करण राजु आकुलवार याला नागपूर येथील एका खाजगी कंपनी मध्ये नौकरी लागली होती, रूजु होण्यासाठी शुक्रवारी 21 मार्च रोजी पहाटे 4.30 वाजता दरम्यान जानाळा येथुन शुभम राजु आकुलवार यांच्यासोबत चंद्रपूरला जात होता, दरम्यान अंधारी नदीच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली, यात दोघेही जण जागीच ठार झाले, 5 दिवसांचा कालावधी लोटुन गेला मात्र अजुनही धडक दिलेल्या वाहनाचा पोलीसांनी शोध घेतलेला नाही, यामुळे कुटुंबियांनी मूल पोलीस स्टेशन येथे येवुन धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्याची मागणी मूल पोलीस स्टेशन येथे केली. त्यासोबतच जिल्हयाचे पालकमंत्री, राज्याचे गृहमंत्री, क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांना प्रतिलीपी केलेली आहे. Illegal sand transportation
अवैध रेती वाहतुकीचा धुमाकुळ
चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणावर ओव्हरलोड रेती वाहतुक केली जात आहे. तालुक्यात कोणत्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसतांनाही मोठया प्रमाणावर अवैध रेती उत्खनन आणि वाहतुक केली जात आहे, अंधारी नदीमधुन रात्रौभर यंत्राचा वापर करून हायवानी अवैध रेती वाहतुक केली जात आहे, महसुल, पोलीस प्रशासनाच्या डोळयादेखत रेती चोरी होत असताना प्रशासन बघ्याची भुमीका घेत असल्याने प्रशासनाप्रती शंका व्यक्त केली जात आहे. आकुलवार कुटुंबियांनी दिलेल्या निवेदनातही रेती वाहतुक करणाऱ्या हायवा वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची शंका व्यक्त केली आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्याही दिशेने तपासाची चक्रे फिरविल्यास दुचाकीला धडक दिलेल्या वाहनाचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला मदत होवु शकतो अशी अपेक्षाही निवेदनातुन व्यक्त केली आहे. Akulavar family