मूल पोलीसांची कारवाई
निनाद शेंडे, मूल : राज्यात बंदी असलेल्या सुगंधीत तंबाखुची सुप्या मार्गाने सर्रास विक्री केली जात आहे, दरम्यान मूल पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांदापूर येथील Chandapur हिमानी किराणा दुकान मधुन 3 लाख 22 हजार 230 रूपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु जप्त केला आहे. सदरची कारवाई मूल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर व पथकाने गुरूवारी सायंकाळी 7 वाजता दरम्यान केली. Mul Police
मूल तालुक्यातील चांदापूर (हेटी) येथील अण्णाजी उमाजी ठाकुर वय 38 वर्षे यांच्या मालकीचे हिमानी किराणा दुकान चांदापूर (हेटी) येथे आहे, सदर किराणा दुकानात राज्यात बंदी असलेले सुगंधीत तंबाखुची सर्रास विक्री होत असल्यची गोपनिय माहीती मूल पोलीस स्टेशनला मिळाली. माहीतीच्या आधारे मूल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर यांनी पोलीस पथकासह चांदापूर (हेटी) येथील हिमानी किराणा दुकानात जावुन दुकानाची चौकशी केली असता त्याठिकाणी होला हुक्का शिशा तंबाखु, मजा, ईगल तंबाखु, विमल पान मसाला, मजा 108 हुक्का शिशा तंबाखु डब्बा, ईगल हुक्का शिशा तंबाखु अशा वेगवेगळया कंपनीचे एकुण 3 लाख 22 हजार 230 रूपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु जप्त करण्यात आला आहे. Aromatic tobacco
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर, पोलीस हवालदार अनिल शेडमाके, पोलीस अमलदार विशाल वाढई, आतीष मेश्राम, पुजा मेश्राम, डेवीड भलवे यांनी केली आहे. सदर कारवाईने अवैध मार्गाने दारूविक्री व सुगंधीत तंबाखुची विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. Himani Kirana