समाजाच्या प्रगतीसाठी समाज संघटनेची आवश्यकता : सरपंच रविंद्र कामडी Saint Shiromani Shri Santaji Jagannade Maharaj

Saint Shiromani Shri Santaji Jagnade Maharaj
Saint Shiromani Shri Santaji Jagnade Maharaj

कोसंबी येथे संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती

मूल (प्रतिनिधी): संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आत्मसात करून समाजाच्या प्रगती, आत्मसन्मान, अस्तित्व, अस्मिता, संरक्षण, शिक्षण, संस्कृती संवर्धनासाठी समाज संघटनेची आवश्यकता आहे असे प्रतिपादन कोसंबी ग्राम पंचायतचे सरपंच रविंद्र कामडी यांनी केले. ते कोसंबी येथे तेली समाजाच्या वतिने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती समारोह आणि समाज प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते. Kosambi

कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते नारायनजी गिरडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोसंबी ग्राम पंचायतचे सरपंच रविंद्र किसन कामडी सरपंच कोसंबी होते. प्रमुख अतिथी म्हणुन सामाजिक कार्यकर्ते युवराज ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक चंदाताई विनोद कामडी, माजी ग्राम पंचायत सदस्य गुरूदास गिरडकर आदी मान्यवर उपस्थित होते. 401st birth anniversary of Saint Shiromani Shri Santaji Jagannade Maharaj

यावेळी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पूष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवराज ठाकरे, चंदाताई कामडी यांनी मार्गदर्शन केले. Mul

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच अंबादास गिरडकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष गुरनुले यांनी केले तर उपस्थितांचे आभार विक्की गिरडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास गिरडकर, विनोद कामडी, पुंडलीक गिरडकर, राजेंद्र गिरडकर, गणेश साठोने, विजय कामडी अनवेश कामडी, यशवंत गिरडकर, भास्कर गिरडकर, भुपतराव कामडी, किसनराव कामडी, गोकुल गिरडकर, सुमित कामडी, आत्माराम गिरडकर, संदीप गिरडकर, विक्रम गिरडकर, लखन गिरडकर, अविष्कार कामडी, सारंग गिरडकर, ओम साई गिरडकर, अमित गिरडकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला कोसंबी येथील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.