मूल (प्रतिनिधी) : येथील लक्ष्मीनारायण राईस मिल मध्ये शॉट सक्रिटमुळे लागलेल्या आगीत अमोल इंटरप्राईजेसच्या मालकीचे धान आणि कोंडा जळुन लाखो रूपयाचे नुकसान झाले, सदर आगीत नुकसान झालेल्या धान आणि कोंड्याचा विमा काढला होता, विम्यांची रक्कम मिळावी यासाठी ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी अभिकर्ता राहुल कोंतमवार यांनी प्रस्ताव सादर केला होता, प्रस्ताव मंजुर होताच अमोल इंटरप्राईजेसचे संचालक अमोल बच्चुवार यांना इंशुरन्सची रक्कम देण्यात आली. ORIENTAL INSURANCE COMPANY
मूल येथील लक्ष्मीनारायण राईस मिल येथे अमोल इंटरप्राईजेसचे संचालक अमोल बच्चुवार यांच्या मालकीचे धान आणि कोंडा होता, 28 जुर्ले 2024 रोजी रात्रौ अचानक शॉर्ट सर्क्रिटमुळे आग लागुन धान आणि कोंडा पुर्णपणे जळुन खाक झाला. यामध्ये लाखो रूपयाचे नुकसान झाले होते. सदर धान आणि कोंड्याचा ओरिएंटल इंश्योरेंस कंपनीकडून विमा काढलेला होता, सदर विम्याचे प्रकरण मूल येथील अभिकर्ता राहुल कोंतमवार यांनी तयार केले होते. शॉर्ट सर्क्रिटमुळे लागलेल्या आगीचा प्रस्ताव ओरिएंटल इंश्योरेंस कंपनीकडे पाठविण्यात आले. कंपनीचे शाखा व्यवस्थापक सचिन पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल येथील अभिकर्ता राहुल कोंतमवार यांनी प्रकरणाचा पाठपुरावा करून अमोल इंटनप्राईजेसचे संचालक अमोल बच्चुवार यांना नुकसान भरपाई मिळवुन दिली. Sachin Padole Rahul Kontamwar