आधारभूत धान खरेदीची नोंदणी प्रक्रिया सेतू मार्फत करावी Purchase of basic paddy

Purchase of basic paddy
Purchase of basic paddy

मूल सोशल फोरमचे विजय सिध्दावार यांची मागणी

मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्हयात आधारभूत धान खरेदीकरीता आपले प्रयत्नातून नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीसोबतच सेतू केंद्रातूनही करावी अशी मागणी मूल सोशल फोरमचे संयोजक विजय सिध्दावार यांनी केली. ही मागणी त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे. Vijay Sidhawar

मूल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या आधारभूत धान खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेत सहभागी होवू इच्छिणार्या शेतकर्यांना प्रचंड मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्यांचा शेतकर्यांचा आरोप आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूलसह आणखी दोन नोंदणी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निर्देश दिले असले तरी, अजूनही ते केंद्र सुरू नसल्यांने, मूल येथेच शेतकर्यांनी गर्दी केली आहे. पहाटे पाच वाजेपासूनच शेतकरी नोंदणी करीता आवश्यक कागदपत्रे घेवून लाईनीत लागत आहेत. मात्र अनेकांची नोंदणी होत नसल्यांने या शेतकर्यांना परत पावली फिरावे लागत आहे. काही शेतकरी तर तीन—तीन दिवसापासून चकरा मारूनही, नोंदणी होत नसल्यांने संताप व्यक्त करीत आहे. Mul APMC

सध्या थंडीचे दिवस असल्यांने, पहाटे आणि सायंकाळी उशीरापर्यंत या शेतकर्यांना थंडीत कुडकुडत नोंदणीसाठी नावाचा पुकारा होईल या आशेवर खुल्या जागेत बसून असल्यांचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या शेतकर्यांना वृध्द महिला शेतकर्यांचाही समावेश आहे. बाजार समितीत नोदणी करण्याकरीता, आवश्यक पुरेसे मणुष्यबळ व संसाधने नसल्यांने अतिशय संथ गतीने ही नोंदणी होत आहे. अनेक बाजार समितीवर कॉंग्रेस विचारांचे संचालक मंडळ असल्यांने व आधारभूत धान खरेदीची योजना ही महायुती सरकारची असल्यांने, या संचालकांकडूनही जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. मागील वर्षीही अशाच संथ गतीने नोंदणी केल्यांने, अनेक शेतकर्यांना नोंदणी करता आली नव्हती व त्यामुळे नोंदणीची मुदत शासनाला वारंवार वाढवून द्यावी लागली होती. यावर्षीही अशीच परिस्थिती होण्यांची भिती आहे. Registration process for purchase of basic paddy should be done through Setu

सेतू केंद्रातून आधारभूत धान खरेदीची नोंदणी केल्यास,गावातच शेतकर्यांना नोंदणी करता येईल, बाजार समितीच्या ठिकाणी येवून, प्रसंगी मुक्काम करून, नोंदणी करण्यांकरीता शेतकर्यांना शारीरीक, आर्थिक व मानसिक त्रास होणार नाही, सेतू केंद्र चालकांना यातून थोडाफार रोजगार उपलब्ध होईल, बाजार समिती संचालकांची मनमानी थांबेल, मुदतील सर्व शेतकर्यांची नोंदणी होवून वारंवार मुदतवाढ देण्याची गरज भासणार नाही, सेतु मार्फतीचे केलेली नोंदणीही अखेर शासनाच्या संबधीत पोर्टलवरच जाईल. सेतू केंद्रामार्फत धान उत्पादकांची नोंदणी केल्यास, वारंवार नोंदणीची मुदतवाढ करण्यांचीही गरज राहणार नाही याकडे विजय सिध्दावार यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले आहे. Sudhir Mungantiwar