गोठयात बांधुन असलेले बकरे अज्ञात इसमाने चोरले Goats were stolen

Goats were stolen
Goats were stolen

मूल तालुक्यातील चिमढा येथील घटना

निनाद शेंडे, मूल
चराई करून आणलेले बकरे गोठयात बांधुन ठेवले असताना अज्ञात इसमानी रात्रौच्या दरम्यान चोरून नेल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा चिमढा येथील बंडु बापुजी लेनगुरे यांच्या घरी मंगळवारी घडली. सदर घटनेची तक्रार बंडु लेनगुरे यांनी मूल पोलीस स्टेशनला दिली आहे. Bandu Bapuji Lengure Chimdha

मूल तालुक्यातील मौजा चिमढा येथील बंडु बापुजी लेनगुरे यांच्याकडे 10 म्हैस आणि 3 बकरे आहेत. सोमवारी चराई करून आणलेली म्हैस आणि बकरे घरीच असलेल्या गोठया बांधुन ठेवले असता अज्ञात इसमानी 2 मोठे बकरे चोरून नेले, दरम्यान बंडु लेनगुरे यांनी सकाळी उठुन आपले पाळीव जनावरे बघितले असता 2 मोठे बकरे गोठयात दिसले नाही, इतरत्र शोधाशोध केले मात्र कुठेही दिसुन आले नाही, याबाबत मूल पोलीस स्टेशन येथे बंडु लेनगुरे यांनी अज्ञात इसमाने बकरे चोरून नेल्याची तक्रार दिली आहे. Mul Police Stetion