श्रीराम गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
मूल (प्रतिनिधी): श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा मूल नगर पालीकेचे माजी नगरसेवक विनोद कामडी यांच्या स्मृतीदिनानिमीत्य विनोद कामडी यांचे घरासमोर 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याशिबीरात 53 रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्ततेने रक्तदान केले. Vinod Kamadi’s memorial day
मूल नगर पालीकेचे माजी नगरसेवक विनोद कामडी यांनी केलेल्या सेवाभावी कार्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहात होते, मात्र 1 वर्षाआधी त्यांचे आजाराने निधन झाले. त्यांनी केलेले सेवाभावी कार्य व स्वभावामुळे ते सर्वांना आपलेले करून गेले. त्यांच्या आठवणी नेहमीच स्मरणात राहाव्या यासाठी श्रीराम गणेश मंडळाच्या वतिने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले, यावेळी स्व. विनोद कामडी यांच्या फोटोला मार्लापन करून श्रध्दांज
ली अर्पण करण्यात आली. यावेळी भारती विनोद कामडी, नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष प्रविण मोहुर्ले, माजी नगरसेवक तथा भाजपाचे मूल शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रशांत बोबाटे, श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष इंजि. रूपेश निकोडे उपस्थित होते. Blood donation camp
रक्तदान शिबीरांसाठी चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक आले होते. यावेळी 53 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. रक्तदान शिबीराच्या यशस्वीयतेसाठी श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष इंजि. रूपेश निकोडे, उपाध्यक्ष आकाश कामडे, सचिव सुधीर ठाकुर, दिपक चौधरी, सागर कामडे, सुरज गावतुरे, रोशन गुरनुले, चेतन कामडे, राहुल घोगरे, कृष्णा चौखुंडे, राजु पाल, रोहित बोरकुटे, आदित्य कामडे, बादल करपे, विलास घोगरे यांनी अथक परिश्रम घेतले.